सुयोग्य नियोजन, आर्थिक शिस्त, पूरक धोरणे व योजना यामुळे स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या अर्थकारणात भरीव वाढ :– अॅड. दीपक पटवर्धन
रत्नागिरी/प्रतिनिधी:- सन २०२०-२०२१ हे आर्थिक वर्ष Covid-19 ने ग्रासलेले वर्ष होते. आर्थिक आव्हानांना सामोरे जात आर्थिक संस्थांचे मार्गक्रमण सुरू आहे. मात्र ०१ एप्रिल २०२० ते २२ जानेवारी २०२१ या कालखंडात स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने भरीव कामगिरी केली आहे. या कालावधीत संस्थेच्या ठेवींमध्ये १८ कोटी ८५ लाखांची वाढ झाली. मार्च अखेर २०१ कोटी ११ लाखांचा ठेवी २२ जानेवारी २०२१ पर्यंत २१९ कोटी ९६ लाखांपर्यंत पोहोचल्या. म्हणजेच ९ महिन्यात १८ कोटींच्या ठेवी स्वरूपानंद पतसंस्थेत गुंतवणूकदारांनी विश्वासाने गुंतवल्या. १८ कोटींची ही वाढ या वर्ष अखेरपर्यंत २२ कोटी पर्यंत जाईल असा शाश्वत अंदाज संस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केला. नववर्ष स्वागत ठेव योजनेला ठेवीदारांचा उत्तम प्रतिसाद प्राप्त होत असून आजपर्यंत ०३ कोटींच्या नवीन ठेवी संस्थेकडे जमा झाल्या आहेत. आर्थिक स्थितीचा अंदाज घेत, सुरक्षिततेला प्राधान्य देत राबविलेले धोरण हे अतिरिक्त व्याजदर देऊन ठेवीदारांना आकर्षित करण्यापेक्षा ठेव सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत विश्वासार्हता जपत संस्थेने केलेल्या मार्गक्रमणामुळे ठेवीदार मोठ्या संख्येने संस्थेमध्ये गुंतवणूक करीत आहेत.
Covid-19 च्या कालखंडात कर्जवितरण व कर्जवसुली ह्या दोन्ही आघाड्यांवर खूप कसरती होत्या. मात्र आपले अनुभवी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सतर्क धोरणामुळे या कालावधीत ०८ कोटी ३२ लाखांचे कर्ज वितरीत करत मार्च २०२० अखेर १४१ कोटी ३८ लाखांचे कर्ज २२ जानेवारी २०२१ पर्यंत १४९ कोटी ७० लाखांचे झाले असून ही वाढ तारणी आणि सोनेतारण कर्ज स्वरूपात आहे. वसुलीमध्येही सतर्क राहत पतसंस्थेने कर्मचाऱ्यांच्या उत्तम सहकार्यामुळे ९८.७३ % एवढी वसुली केली असून 0 % NPA प्रमाण याही वर्षी राहील असा विश्वास अध्यक्षांनी व्यक्त केला.
या कालावधीत संस्थेची बँकांमधील गुंतवणूक १७ कोटी ३५ लाख रुपयांनी वाढली असून मार्च २०२० अखेर ८७ कोटी ७० लाख असलेल्या गुंतवणुका जानेवारी २०२१ मध्ये १०३ कोटी ०६ लाखांवर पोहोचल्या. ठेवींच्या २५ % प्रमाणात गुंतवणूका करण्याचे धोरण कटाक्षाने पाळले असून २१९ कोटींच्या ठेवी मधून १०३ कोटी बँक गुंतवणूक केली आहे. ठेव कर्जाचे प्रमाण ६० % ठेवण्यात संस्थेला यश आले आहे. ठेव रक्कम आणि कर्ज वितरण यांचे गुणोत्तर ६० % प्रमाणात राखण्याची किमया संस्थेने साधली आहे.
संस्थेच्या १७ ही शाखा उत्तम व्यवसाय करत असून नववर्ष स्वागत ठेव योजना स्वरूपांजली ठेव १५ महिने ते १८ महिने सर्वसाधारण ७.१५%, ज्येष्ठ नागरिक व महिला ७.३०%, एकरकमी १० लाख ७.५०% , सोहम ठेव योजना १९ ते ६० महिने (मासिक व्याज) सर्वसाधारण ७.००%, ज्येष्ठ नागरिक व महिला ७.१०%, व्याजदर या योजनांमध्ये अंतिम आठवड्यात ठेवीदारांनी मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करून शाश्वत व्याज परतावा व सुरक्षिततेचा लाभ घेत गुंतवणूक करावी असे आवाहन अॅड. दीपक पटवर्धन यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा