सुशांत आगरे यांनी केले लांजा तालुक्यातील रावारी गावाच नाव रोशन, तबोना पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप मुंबई यास्पर्धेमध्ये मोठे यश

  


लांजा ( प्रतिनिधी दीपक मांडवकर) लांजा तालुक्यातील ग्रामीण भागातील  सुशांतने तबोना पॉवरलिफ्टिंग स्पर्धेची तयारी सुरू केली होती. गेल्यावर्षी ज्युनिअर महाराष्ट्र श्री नंतर पुन्हा विजयी घोडदौड सुरू ठेवत मुंबई येथे झालेल्या स्पर्धेत भाग घेतला.

आजवर कोकणाने महाराष्ट्रला नेहमी यशस्वी कार्यक्षम रत्न दिले आहे. सुशांत सोनू आगरे हा शेतकरी कुटूंबातील तरुण आज आपल्या आई- वडील पासून लांब राहून करत आहे. लांजा तालुका मधील  रावारी गावाच नाव रोशन केले.  नुकत्याच पार पडलेल्या तबोना पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिप मुंबई यास्पर्धेमध्ये किमान १०० स्पर्धक उपस्थित होते. मुंबई बोरिवली येथील या स्पर्धात ७५ किलोग्रॅम वजनी गटांमध्ये सुशांत ने चौथा क्रमांकाने विजयी श्री खेचत आणला. स्पर्धाचे आयोजित मिस्टर वर्ल्ड  मंगेश गावडे  यांनी केलं होतं. सुशांत आता आंतरराष्ट्रीय स्पर्धेत साठी तयारी करतो आहे. यासाठी प्रचंड  मेहनत करत आहे. या मेहनतीला खंबीर हाताची ही गरज आहे. असे मन ग्रामस्थांनी वेक्त केले.

टिप्पण्या