गुहागर प्रतिष्ठानच्या वतीने विरार मानवेल पाडा जिल्हा परिषद शाळा येथे भव्य रक्तदान शिबिर संपन्न

 



विरार:(प्रतिनिधी दीपक मंडवक) रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असे मानले गेले आहे. नवीन  वर्षाच्या सुरुवातीला  गुहागर प्रतिष्ठानच्या वतीने विरार मानवेल पाडा जिल्हा परिषद शाळा येथे भव्यदिव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. ह्या मध्ये ऐकून ५६ रक्तदात्यांनी सहभाग घेतला होता. या शिबिरासाठी शताब्दी ब्लड बँकने सहकार्य केले.

 तर या सोहळ्याला प्रमुख मान्यवर म्हणून श्री.  गुहागर अडुर मुंबई मंडळाचे सचिव श्री. दिलीप हळवे, जनशक्ती दबावचे विषेश प्रतिनिधी (पत्रकार) श्री. दीपक मांडवकर, गुहागर पाटपन्हाळे मुंबई जागृती  विकास मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. भालचंद्र भेकरे, गुहागर अडुरवावडगाणेश्वर मिरुल विकास मंडळाचे अध्यक्ष श्री. दिलीप मांडवकर, साई एकदंत रहिवाशी सेवा संघाचे अध्यक्ष श्री. प्रकाश नाडकर व प्रतिष्ठाचे सर्व सभासद उपस्थिती होते. सुरवातीला श्री. मिलिंद पवार  यांच्या हस्ते दीप प्रवजवलीत करण्यात आले. तर गुहागर प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्री. योगेश कदम यांच्या हस्ते शिवछत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीला पुष्प माळा अर्पण करण्यात आले. सचिव श्री. गणेश हळये, प्रभाकर नितोरे, निलेश धनावडे, विनायक चव्हाण, वैभव हळये, सुनील हळये, अंकुश मुकानाक, रवींद्र साळवी, संतोष परदळे, मनोहर साहेब, गजानन किलजे साहेब, दिलीप मांडवकर, एकनाथ मांडवकर, मुकेश तळेकर यांच्या सह गुहागर प्रतिष्ठानच्या सर्व शिलेदारांच्या नेतृत्वाखाली हा सुवर्ण भवैदिव्य रक्तदान शिबिर कार्यक्रम पार पडला. 

तर गुहागर वाशीयांसाठी खंबीरपणे उभे राहू आणि कधीही रक्ताची गरज भासल्यास ते त्वरित त्यांच्या पर्यंत पोचवू असे मत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष श्री. योगेश कदम यांनी मानले.

टिप्पण्या