नगरसेवक श्री. अनिल कोकीळ यांना मुलखावेगळी मांणस हा किताब प्रदान

 


मुंबई (प्रतिनिधी दीपक मांडवकर) 

मुंबई लालबाग परळ विधानसभा क्षेत्रातील विद्यमान शिवसेनेचे नगरसेवक श्री.अनिल कोकिळ यांनी  कोरोना काळात डोळ्याला डोळा न लावता अलौकिक कार्य केलं, विभागातील सुमारे १५० हुन अधिक कोरोना रुग्ण यांना हॉस्पिटलमध्ये बेड आणि गरजुंना आय.सी.यु सुद्धा थेट तेथे जाऊन  मिळवुन दिले. कोरोंटाईन झालेल्या कुटुंबाना धीर देऊन त्यांची व्यवस्था अनेक शिबिरांमध्ये केली हे सारे त्यांनी समाजभावना म्हणून स्वतःच्या ही जीवाची पर्वा न करता केले कोरोना काळात श्रीवर्धन येथील आदिवासी बांधवांचे ब्रेन-ट्यूमरचे ऑपरेशन असो. की लालबाग गैस सिलेंडर स्फोटातील दुर्घटना आदी कामांतील त्यांची तडफेने काम करण्याची पद्धत साऱ्या विभागाने पहिली. म्हणूनच साऱ्या लालबाग-परळ मध्ये आज श्री. अनिल कोकीळ यांचे नाव घराघरात पोहचले आहे. घरी आजारी असणाऱ्या जेष्ठ नागरिकांना विनामूल्य औषधे दिली. गैस सिलेंडर घरपोच दिले गरजुना जीवनावश्यक शिधा 

देण्यात आला. स्वतः जातीने उपस्थित राहून  कोरोना बॉडी नेणाऱ्या गाड्यांचा भ्रष्टाचार बाहेर काढून तेथे सुव्यवस्था निर्माण केली. या त्यांच्या कार्याची दखल अनेक संस्थांनी घेतली पोष्टाने तर त्यांचे तिकीट छापले. शेकडोंच्या संख्येने कोरोना योद्धा पुरस्कार मिळाले. आज त्यांच्या कार्याला 

खरोखरच शोभेल असा सन्मान मुलखावेगळीं माणस त्यांना मिळाला आहे. अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात येणार आहे. याबद्धल कोकीळ साहेब यांचे मनःपूर्वक अभिनंदन संपूर्ण विभागातील जनता करत आहे.

टिप्पण्या