अर्णब गोस्वामीसह सरकारमधील उच्चपदस्थांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा- वसई विरार काँग्रेस
रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी आणि बार्कचे अधिकारी पार्थो दासगुप्ता यांच्यातील व्हाट्सअप चॅटमधून अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. विशेषतः पुलवामा येथे सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानातील बालकोटवर भारताने हवाई हल्ला केला. या कारवाईची माहिती अर्णब गोस्वामीना घटनेच्या तीन दिवस आधीच होती असे या संभाषणातून स्पष्ट दिसत असल्याचे म्हणत देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत गोपनीय व संवेदनशील माहिती गोस्वामीकडे कशी आली? देशाच्या संरक्षणविषयक महत्वाची माहिती बाहेर येणे हे अत्यंत गंभीर असून लष्करी कारवाई संदर्भातील माहिती बाहेर कशी आली? ही माहिती गोस्वामी या पत्रकाराला कारवाई होण्याच्या तीन दिवस आधी म्हणजे २३ फेब्रुवारी २०१९ रोजी कशी काय मिळाली? असे गंभीर प्रश्न उपस्थित करत त्याने अजून कोणाला ही माहिती दिली का? तसेच त्याने स्वतः सांगितले आहे की, ज्याने त्याला ही माहिती दिली तो मोदी सरकार मधील मोठा व्यक्ती आहे. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी होणे गरजेचे आहे. अर्नब गोस्वामी यांचे कृत्य हे official secrets act,1923,
sec.5 नुसार कार्यालयीन गोपनियतेचा भंग करणारे तर आहेच परंतु हा देशद्रोहाचा प्रकार सुद्धा आहे. त्यामुळे रिपब्लिक भारत टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल याची कृपया गंभीर नोंद घ्यावी असा गर्भित इशारा वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी दिला आहे. आंदोलनादरम्यान अर्णब गोस्वामीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा यासाठी उपस्थित महिला आणि पुरुष कार्यकर्त्यांनी अर्णब याच्या प्रतिमेला चप्पला मारून आपला राग व्यक्त केला. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, उपाध्यक्ष दिनेश कडुलकर, ए के अश्रफ,
अल्पसंख्यांकचे अर्षद डबरे, बोईसर विधानसभा अध्यक्ष शेहजाद मलिक व त्यांचे सहकारी, विरार ब्लॉक अध्यक्ष नितीन उबाळे, पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. वसई ब्लॉक काँग्रेसच्या अध्यक्षा बिना फुर्ट्याडोंसह २५० ते ३०० महिला या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा