‘आम्ही कुर्णेकर’ प्रतिष्ठानच्यावतीने १५० विद्यार्थांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
लांजा ( प्रतिनिधी) तालुक्यातील कुर्णे पंचक्रोशी सह तालुक्याच्या शैक्षणिक सामाजिक व क्रीडा क्षेत्रात सतत विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या आम्ही कुर्णेकर प्रतिष्ठान च्या वतीने नुकतेच कुर्णे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील शाळातील सुमारे १५० विद्यार्थ्यांना मोफत वह्या तसेच शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम घेऊन सामाजिक बांधिलकी जोपासल्याने या मंडळाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
या मोफत शैक्षणीक साहित्य वाटप कार्यक्रमप्रसंगी मंडळाचे अध्यक्ष रमेश पडये, कार्याध्यक्ष गणपत घडशी, उपाध्यक्ष रविकांत चव्हाण ,सामाजिक कार्यकर्ते काशिनाथ माने, गौतम कदम, पोलीस पाटील राजेश मोरे, संदीप घडशी, अमोल कदम, अनिल गुरव तसेच प्रतिष्ठान चे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रतिष्ठानच्या वतीने काही दिवसांपूर्वी लांजा अनाथाश्रम व महिलांश्रम येथे नवलाई देवीच्या यात्रोस्तवानिमित मोफत अन्नदान कार्यक्रम देखील घेण्यात आला होता. आम्ही कुर्णेकर प्रतिष्ठानच्या या विविध सामाजिक व शैक्षणिक उपक्रमामुळेच तालुक्यातील एक अल्पावधीतच तालुक्याच्या सर्वच क्षेत्रात आपले स्थान निर्माण केले असून या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा