डॉ. श्री. संजय जाधव यांच्या सहकार्याने वसई विरार शहर महानगरपालिकेच्या वतीने मोफत बाह्यरुग्ण तपासणी शिबीर मोरगाव येथे संपन्न तर १७४ राहिवश्यना घेतला उपभोग
नालासोपारा ( प्रतिनिधि दिपक मांडवकर)
नालासोपारा येथे शुक्रवार दिनांक २९जानेवारी रोजी जिजाईनगर मोरगाव येथे वाड नं. ३९चे बहुजन विकास आघाडीचे संपर्क प्रमुख डॉ. संजय जाधव यांच्या सहकार्याने साई छाया विद्यामंदिर येथे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान अंतर्गत वसई विरार शहर महानगरपालिका तर्फे वैद्यकीय आरोग्य विभाग नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र मोरगाव तलाव यांच्या वतीने गरीब गरजू घटकांसाठी मोफत बाह्यरुग्ण तपासणी शिबिराचे आयोजन केले.
या शिबिरात प्रामुख्याने अंगणवाडी सेविका, आशा वर्करस, सफाई कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स सह विभागातील सर्व रहिवाश्यानी भाग घेतला व आरोग्य तपासणी केली. विशेष तपासणी म्हणून माता बालसंगोपन, प्रस्तुती पूर्व, प्रस्तुती पश्चात आरोग्य तपासणी, नवजात शिशु लसीकरण, किशोरवयीन मुलींचे आरोग्य तपासणी, लसीकरण व समुपदेशन, साथरोग तपासणी व औषधपचार सामान्य रुग्ण तपासणी, टी. बी. तपासणी, कुष्टीरोग तपासणी, मधुमेह तपासणी, आरोग्य शिक्षण व रक्तदाब तपासणी केली गेली. तर या शिबिराचा १७४ रहिवाशी बांधवांनी उपभोग घेतला. आणि विभागातील रहिवाशांनी डॉ. संजय जाधव यांचे मनःपूर्वक आभार मानले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा