नालासोपारा येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने प्रजासत्ताक दीना निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन.
वसई : नालासोपारा प्रतिनिधी (श्री. दिपक मांडवकर) नालासोपारा पूर्व येथील नागीनदास पाडा मोरेगाव विभागामधील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने प्रजासत्ताक दीना निमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. कोरोना काळात विभागातील रहिवाशांना अन्नधान्य पुरावठ्या पासून ते अत्याआवश्यक सेवा देणाऱ्या प्रत्येकाना कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात आला.
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पालघर मा.तालुका अध्यक्ष श्री.नितीन मोरे आणि शहर अध्यक्ष श्री.अमित नारकर, विभाग अध्यक्ष श्री. सुमित पवार उपविभाग अध्यक्ष श्री. मंगेश भालेराव आणि संदीप गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम पार पडला. सर्वं मनसे सैनिकांचे आणि नागरिक यांचे मनापासून आभार मानले.
या भव्य रक्तदान शिबिराला १३५ रक्त दात्यांनी रक्तदान केले. तर विभागातील रहिवाशांना कधीही रक्ताची गरज भासल्यास आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी असून, कोणतीही गैरसोय होऊ देणार नाही. असे शेवटी ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन श्री. अमित नारकर यांनी मत वेक्त केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा