नालासोपारा येथे शिवसेना हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे जन्मदिना निमित्त रक्तदान शिबिराचे व कोरोना योद्धा सन्मानाचे आयोजन.

 



वसई : नालासोपारा प्रतिनिधी (श्री. दिपक मांडवकर) नालासोपारा पूर्व येथील नागीनदास पाडा वाड नं ४७ मधील शिवसेना शाखेच्या वतीने हिंदू हृदयसम्राट बाळा साहेब ठाकरे यांच्या जन्म दिनानिमित्त रक्तदार शिबीराचे आयोजन करण्यात आले. व काल मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले. 

कोरोना काळात अत्यावश्यक सेवा देणाऱ्या प्रत्येकाना कोरोना योद्धा पुरस्कार देण्यात आला आणि आरोग्य शिबीर हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनानिमित्त महा क्तदान शिबिर शिवसेना पालघर मा.जिल्हा प्रमुख श्री. शिरीषदादा चव्हाण साहेब आणि शहर प्रमुख श्री.प्रदीप सावंत साहेब, उपशहर प्रमुख श्री. वैभव पालव साहेब याच्या मार्गदर्शनाखाली रक्तदान, आरोग्य शिबीर, कोरोना योद्धा म्हणून (पोलीस,डॉक्टर, सिस्टर, साफसफाई कर्मचारी) यांचा सन्मान करण्यात आले. तसेच सर्वं पदाधिकारी युवासेना, महिला आघाडी, युतीसेना, सर्वं शिवसैनिक आणि नागरिक याचे मनापासून आभार  मानले.


सादर कार्यक्रमाला विभागातील शिवभक्तांनी प्रचंड प्रतिसाद दिला. या रक्तदान शिबिराला  १०९ रक्त दात्यांनी रक्तदान केले. या कार्यक्रमाचे संपूर्ण नीयोजन उप शहर प्रमुख श्री. वैभव पालव, उप विभाग प्रमुख श्री. नीलेश तेलंगे, शाखा प्रमुख  श्री. राजेंद्र महाडिक यांनी केले. तर विभागातील रहिवाशांना कधीही रक्ताची गरज भासल्यास आम्ही सदैव त्यांच्या पाठीशी असून, कोणतीही गैरसोया होऊ देणार नाही. असे मत वेक्त केले.

टिप्पण्या