वसई विरार महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची जय्यत तयारी
प्रदेश
काँग्रेसने इच्छुक उमेदवारांची यादी मागवली.
मुंबई - वसई विरार महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष तयारीला
लागला असून इच्छुक उमेदवारांचे अर्ज मागवण्यास सुरुवात केली आहे. सर्व ब्लॉक
अध्यक्षांनी इच्छुक उमेदवाराकडून अर्ज भरून घ्यावेत. आवश्यक अर्ज काँग्रेस भवन, पारनाका, वसई येथे
उपलब्ध आहेत,
अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश
काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा वसई विरार महापालिका निवडणुकीसाठीचे निरीक्षक राजेश
शर्मा यांनी दिली आहे.
शर्मा
यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे की, कोरोना महामारीमुळे मुदत संपूनही वसई विरार महानगरपालिकेच्या
निवडणुकांना खूप उशीर झाला आहे. सद्यस्थितीत महापालिकेचा सर्व कारभार प्रशासन
चालवत आहेत. महपालिका निवडणुका कधीही जाहीर होवो काँग्रेस पक्षाने मात्र आतापासूनच
तयारी सुरु केली आहे. प्रदेशाध्यक्ष ना. बाळासाहेब थोरात यांच्या सुचनेनुसार
निरीक्षक राजेश शर्मा यांनी इच्छुक उमेदवारांची यादी मागवली आहे. कोव्हीड-१९
साथरोगामुळे पक्षीय कार्यक्रमांवर बंधने आली होती पण आता परिस्थिती बदलत असून
काँग्रेस पक्ष निवडणुकीच्या कामाला लागला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा