कोकण मानवसेवा प्रतिष्ठानच्यावतीने ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात मेडिकल कॅम्पचे आयोजन

 


ठाणे (प्रतिनिधी) नवीन वर्षे नवीन संकल्प करीत ठाण्यातील नामांकीत संस्था कोकण मानवसेवा प्रतिष्ठान यांच्यावतीने जिल्ह्यातील जव्हार,वाडा,मोकाडा,शहापूर आदी ग्रामीण भागात  10 जानेवारी ते 15 जानेवारी 2021 रोजी मेडिकल कॅम्पचे आयोजन करण्यात येणार असल्याचे संस्थापक अध्यक्ष श्री डा.पी.जी.पवार यांनी सांगितले आहे.

 गेली 35 वर्षे कोकण मानवसेवा प्रतिष्ठानच्यावतीने समाजातील वंचित घटकांना मेडिकल कॅम्पद्वारे तपासणी करुन निदान केले जात आहे.ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात असलेल्या कुपोषित बालक,वृद्धाश्रम,बालआश्रम आदी ठिकाणी जाऊन रुग्णांची तपासणी करण्यात येत आहे.यावर्षीही ईसीजी,मधुमेह,आणि कॅन्सरसारख्या रोगांवर चाचण्यांसोबत आयुर्वेदिक औषधेही मोफत देण्यात येणार आहेत.शिवाय डोळे,हाडे,कार्डीओलॅजी,रक्त तपासणी मोफत केली जाणार आहे.

 ग्रामीण भागात गरोदर मातांना पुरेशे अन्न मिळत नाही.त्यामुळे जन्म घेणारे बाळ हे कुपोषित म्हणून जन्माला येते.शिवाय अशा मातांना कॅल्शियम आणि आयन,प्रोटिन्सची कमतरता असल्याने बाळंतपणास मोठ्या अडचणी येत असतात.अशा मातांची तपासणी करुन त्यांना योग्य उपचार करणे आदी कार्ये या मेडिकल कॅम्पमध्ये केली जाणार असल्याचे डाँ.श्री पी.जी.पवार यांनी सांगितले आहे.ज्यांना या ग्रामीण भागात घेण्यात येणाऱ्या कॅम्पसाठी मेडिकल औषधांचा पुरवठा किंवा आर्थिक मदत करावयाची असल्यास सढळ हातांने 9987982077 या क्रमांकावर संपर्क करा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्री पी.जी.पवार यांनी केले आहे.

टिप्पण्या