कर वसुली न झाल्यास होणार कठोर कारवाई नवीन मालमत्तांसाठी सर्वेक्षण करण्याचे आयुक्तांचे आदेश




ठाणे : दिलेल्या उद्दिष्ठानुसार मालमत्ता आणि पाणी पुरवठा कराची वसुली न झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत देतानाच महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी नवीन मालमत्तांचा शोध घेण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर सर्वेक्षण करण्याचे आदेश सर्व प्रभाग समितीस्तरीय अधिकाऱ्यांना दिले आहेत. नवीन मालमत्तांचा शोध घेवून त्यांना कर आकारणी करून उत्पन्न वाढीसाठी महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे.

       महापालिका क्षेत्रात मालमत्ता व पाणी पुरवठा कर वसुली मोहीम सुरू असून आज महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी ठाणे महापालिकेच्या नागरी संशोधन केंद्र येथे विभाग प्रमुखांची बैठक घेवून कर वसुलीचा आढावा घेतला. यावेळी अतिरिक्त आयुक्त(2) संजय हेरवाडे हे उपस्थित होते.

       महानगरपालिकेच्यावतीने सन 2020-21 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर आणि पाणी देयकांची तसेच मागील थकबाकी वसुलीकरिता तसेच मोठया प्रमाणात मोहीम राबविण्यात येत आहे. १०० टक्के वसुलीकरिता प्रभाग समितीनिहाय दैनंदिन उद्दिष्ठे देण्यात आली आहेत. दिलेल्या उद्दिष्ठानुसार मालमत्ता आणि पाणी पुरवठा कराची वसुली न  झाल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे संकेत महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिले आहेत.  प्रभाग समितीनिहाय देण्यात आलेले दैनंदिन उद्दिष्ठे १०० टक्के पूर्ण करून वसुलीचा दैनिक आढावा सादर करण्याचे निर्देशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

        महापालिका क्षेत्रातील  नवीन मालमत्तांचा शोध घेण्यासाठी प्रभाग समिती स्तरावर सर्वेक्षण करण्याचे आदेशही सर्व सहाय्यक आयुक्तांना देण्यात आले असून नवीन मालमत्तांना कर आकारणी करून महापालिकेचे आर्थिक उत्पन्न वाढीसाठी महापालिका आयुक्तांनी हा निर्णय घेतला आहे. तसेच जे थकबाकीदार पाणीपुरवठा कर भरणार नाहीत त्यांची नळ संयोजने खंडीत करून पाणीपुरवठा बंद करण्यासोबतच जप्तीची कारवाई करण्याचे आदेशही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले

टिप्पण्या