ठाणे कळवा- मुंब्रा विभागात सहा. आयुक्त सचिन बोरसे यांची अनधिकृत बांधकामे विरोधात धडक कारवाई.
ठाणे :- ठाणे मनपात अनधिकृत बांधकामे विरोधात जोरदार कारवाई ठाणे मनपा आयुक्त डॉ विपीन शर्मा यांच्या आदेशानुसार अतिक्रमण उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा / मुंब्रा येथे सहा.आयुक्त सचिन बोरसे यांनी अनधिकृत बांधकामे विरोधात कडक कारवाई मोहीम वेळेवेळी हाती घेत अनेक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून समभधित लोकांवर कायदेशीर कारवाई केली.शासन/ प्रशासन जागतिक महामारी कोरोना विरोधात रात्रंदिवस, जीवधोक्यात घालून लोकांचे जीव वाचवत असतांना व्यस्त असून करोना संसर्गा चे शासकीय अटी/ शर्तीत शिथीलता मिळताच काही जमाजविघातक वृत्ती पुन्हा डोकं वर काढून कायदे व नियम धाब्यावर बसवून अनधिकृत बांधकामना सुरुवात करीत असल्याचे आयुक्त डॉ विपीन शर्मा व उपायुक्त अशोक बुरपल्ले यांच्या निदर्शनास येताच त्यांनी अनधिकृत बांधकामे विरोधात मोहीम हाती घेतली आहे. सतत कारवाई करूनवेळोवेळी समज देऊन कळवाव्यात व मुबऱ्यात अनधिकृत बांधकामे पुन्हा डोकं वर काढत असल्याचे दिसताच सहा.आयुक्त सचिन बोरसे यांनी कोरोना विरोधी लढाई लढतकोरोना वर नियंत्रण आणून अनधिकृत बांधकामे वर जोरदार कारवाई सुरू केली असून अनेक अनधिकृत बांधकामे जमीनदोस्त करून तथाकथित बिल्डर्स वर कायदेशीर कारवाई करत धडा शिकवला आहे अशी चर्चा आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा