राज्यातील राखीव पोलीस बलाच्या समस्या सोडविण्यासाठी समाजसेविका आश्विनी अमोल केंद्रे जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे करणार आमरण उपोषण
ठाणे ( प्रतिनिधी) एक वर्षे झाले तरी राज्यातील पोलिस बांधवांच्या स्व मालकीची घरे मिळणे,8 तास ड्युटी,सातवा वेतन,आंध्र प्रदेश,तेलंगणा,केरळ राज्यातील पोलिसांच्या प्रमाणे महाराष्ट्र पोलिसांना वेतन मिळावे,राज्य राखीव पोलीस बलाची जिल्हा बदली 10 वर्ष करण्यास विलंब झाल्याने समाजसेविका आश्विनी अमोल केंद्रे 1 जानेवारी 2021 रोजीपासून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर,शासकिय विश्रामगृह येथे राज्य सरकार विरोधात श्राद्ध घालणार आहेत.तर 20 जानेवारी 2021 पासून पुन्हा उपोषण करण्यास सुरवात करणार आहेत.
पहले खाकी फिर बाकी
मी. समाजसेवक अमोल धनराज केंद्रे यांनी दिनांक 8/03/2019 रोजी पोलिसांच्या समस्या सोडवण्यासाठी स्व मालकीची घरे मिळणे,8 तास ड्युटी,सातवा वेतन,आंध्र प्रदेश,तेलंगणा,केरळ राज्यातील पोलिसांच्या प्रमाणे महाराष्ट्र पोलिसांना वेतन मिळावे,राज्य राखीव पोलीस बलाची जिल्हा बदली 10 वर्ष करण्यासाठी तसेच आणखी इतर मागणीसाठी आझाद मैदान येथे उपोषण केले होते.त्यावेळी पोलीस उपआयुक्तांच्या मध्यस्थीने मंत्रालय येथे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांची भेट घेवून निवेदन दिले.परंतु 2 वर्ष होत आली तरीही पोलीस बांधवांच्या मागण्या मंजूर करण्यात आल्या नाहीत.दि. 16/8/2019 रोजी शिवसेना युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निवेदने देण्यात आली. तरीही राज्य राखीव पोलिस जवानांची मागणीकडे लक्ष दिले जात नव्हते.त्यामुळे समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे यांनी 1 डिसेंबरला मुंडण करून निषेध केला.
महाराष्ट्र पोलिसांच्या समस्या सोडवण्यासाठी भारत देशाचे मा राष्ट्रपती, मा पंतप्रधान , मा केंद्रीय गृहमंत्री ,महाराष्ट्राचे मा मुख्यमंत्री, मा उप मुख्यमंत्री, मा गृहमंत्री , म न से अध्यक्ष मा राज ठाकरे , वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष मा बाळासाहेब आंबेडकर, मा समाजसेवक अण्णा हजारे,समाजसेवक मा नितीन नांदगावकर ,समाजसेविका मेघा पाटकर ,तसेच महाराष्ट्रातील 288 आमदार पैकी 242 आमदार, तसेच , 48 खासदार यांना भारतीय डाक विभागाच्या ठाणे कार्यालयाच्या मार्फत निवेदन पाठवण्यात आले आहे.
जो पर्यंत SRPF जवानांची जिल्हा बदली 10 वर्ष करण्याची मागणी पूर्ण होणार नाहीत तोपर्यंत हा लढा सुरूच राहील. दिनांक 1 डिसेंबर 2020 रोजी समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे यांनी मुंडण केले.दिनांक 7/12/2020 रोजी मुंडण केलेले केस मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री ,गृहमंत्री ,पर्यावरण मंत्री यांना पोस्टाने पाठवण्यात आले आहेत.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात आंदोलन करून शेवटी 20 जानेवारी 2021 रोजी ठाणे शहर शासकीय विश्रामगृह येथे समाजसेविका सौ अश्विनी अमोल केंद्रे आमरण उपोषण करणार आहेत.सदर आंदोलन हे कोणत्याही राजकीय पक्षाचे मन दुखवण्यासाठी होत नसून या मागचा प्रामाणिक उद्देश हाच आहे की राज्य राखीव पोलिस बलाची जिल्हा बदली 15 वर्षाची अट रद्द करून 10 वर्ष व्हावी.आणि त्यांना न्याय मिळावा असे सौ आश्विनी अमोल केंद्रे यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा