शिवगणेश मित्र मंडळ व रहिवाशी संघाच्या वर्ष २०२१ दिनदर्शिकेचे अनावरण सोहळा संपन्न


नालासोपारा : दिनांक २५ डिसेंबर (प्रतिनिधी श्री. दीपक मांडवकर) शिवगणेश मित्र मंडळ व रहिवाशी संघाच्या  वतीने वर्ष २०२१ दिनदर्शिकेचे अनावरण सोहळा श्री. गोविंद लक्ष्मण गवस (इंडियन आर्मी ) ह्यांच्या शुभहस्ते दिनदर्शिकांचे उद्धघाटन करण्यात आले . मंडळाच्या स्थापने पासून मंडळ उभे करण्यासाठी अथक मेहनत घेतली पालघर जिल्ह्याचे माजी जिल्हा प्रमुख व सर्वांचे मार्गदर्शक श्री शिरीष दादा चव्हाण यांचे सर्व मान्यवरांनी आपापल्या मनोगतावेळी आभार मानले उद्धघाटन वेळी उपस्थित मंडळाचे आधारस्तंभ श्री. संतोष कदम, शिवसेना नालासोपारा शहर प्रमुख श्री. प्रदीप सावंत, युवासेना नालासोपारा विधानसभा अधिकारी कु. रोहन शिरीष चव्हाण, शिवसेना उपशहर उपप्रमुख (मा.नगरसेवक )श्री स्वप्नील बांदेकर, समाजसेवक श्री.रुपेश दिलीप दौंड, युवासेना नालासोपारा शहर सचिव कु. नितेश कुवेसकर, शाखाप्रमुख श्री. के. के. भालेकर, समाज सेवक श्री. अनंत फीलसे, वसई तालुका रिक्षा युनिअन चे सहचिटणीस व मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. दीपक नारकर, जिजाई नगर उपशाखा प्रमुख श्री.संतोष शिंदे हे उपस्थित होते. सदर कार्यक्रम योग्यरीत्या पार पडण्यास अथक मेहनत घेतली ते मंडळाचे अध्यक्ष श्री.राजेंद्र राऊळ मा .अध्यक्ष  सस्थापक  सचिन गावकर मा.अध्यक्ष दीपक नारकर, उप अध्यक्ष समीर चीखले, खजिनदार मंगेश मोरे, मा. खजिनदार अरुण अढखले, तसेच डिझानायर सभासद संकेत पाताडे, सागर कूल्ये यांनी सहकार्य केले. आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी मंडळाला योग्य मार्गदर्शन, सल्ले व आपले मंडला बद्दल आलेले अनुभव सांगितले व मनोगत वेक्त केले. 

जाहिरात रूपाने आलेल्या देणेगेची समाजउपयोगी कामे करण्याचा मानस आहे. मंडळाच्या आजी माजी पदाधिकारी व मंडळाच्या सर्व सदशयानी गेल्या २ महिन्या पासून दिनदर्शिकाचे जाहिराती व कार्यक्रमासाठी खूप मेहनत घेतली. दिनदर्शिका साठी दिलेल्या सर्व देणगीदारांचे व जाहिरात धारकांचे आभार मानले.


टिप्पण्या