कांजूरमार्ग येथे गुरुवारी "जनेरीक औषधालय"चे भव्य उद्घाटन
सौ.शर्मिलाताई ठाकरे करणार सिनेकलाकार संजय नार्वेकर व गायक स्वप्निल बांदोडकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन
मुंबई( समीर खाडिलकर/शांत्ताराम गुडेकर)मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट आणि मेडिकल रिसर्च सेंटर यांच्या आशिर्वादाने कांजूरमार्ग पूर्व येथे जनरिक औषधालय समाजहितासाठी स्वस्त व गुणकारीअसे औषधांचे दुकान "जनहित केमिस्ट व मेट्रोपलिस् " चे भव्य उद्घाटन मा.सौ.शर्मिलाताई राजसाहेब ठाकरे यांच्याहस्ते सिनेकलाकार संजय नार्वेकर व गायक स्वप्निल बांदोडकर,ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक,आमदार सुनिल राऊत,शिवाजीराव नलावडे(उपाध्यक्ष- रा,काँ.पा.मुंबई प्रदेश) यांच्या विशेष उपस्थितीत गुरुवार दि.२४डिसेंबर २०२० रोजी सकाळी ११-३० वा.शाँप नं.६,राम रहिम चाळ,नेहरु नगर,कांजूर व्हिलेज रोड,अनिकेत हाँस्पीटलच्या बाजूला,कांजूरमार्ग (पूर्व),मुंबई- ४२ येथे होणार आहे.यावेळी मनसेचे ठाणे- पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव,रा.काँ.पा.जिल्हाध्यक्ष धनंजय पिसाळ,मनसे म.उपाध्यक्ष अनिशा माझगावकर,शिवसेन नगरसेविका सुवर्णा करंजे,भाजपा नगरसेविका सारिका पवार,साक्षी दळवी,निमंत्रक मनोज चव्हाण( विश्वस्त-मातोश्री सेवाधाम ट्रस्ट) ,विश्वस्त विनोद शिनकर,अमित बने,विनोद शिंदे आदी मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे. या जनेरिक औषधालयमुळे जनतेला बँडेड जेनेरिक औषधांवर १०% ते ८०% पर्यंतची बचत होणार असून या संधीचा लाभ रहिवाशांनी घ्यावा असे आवाहन विश्वस्त- मा.से.ट्रस्टचे मनोज चव्हाण यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा