राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ईशान्य मुंबई जिल्हा सचिव केतन भोज यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबीर व कोरोना योद्धा सन्मान सोहळा संपन्न



मुंबई,(प्रतिनिधी ) आर.आर.पाटील फाऊंडेशन संलग्न समता प्रतिष्ठान व पँथर राजाभाऊ गांधले सामाजिक संस्था,मायक्रोलिंक फाऊंडेशन आयोजित श्री.केतन दत्ताराम भोज( ईशान्य मुंबई जिल्हा सचिव-राष्ट्रवादी युवक काँग्रेस ) यांच्या वाढदिवसानिमित्त महात्मा गांधी सेवा मंदिर ब्लड बँक यांच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबीर शुक्रवार दि.२५ डिसेंबर रोजी समता बुद्ध विहार, इंदिरा नगर नं.०२ घाटकोपर(प.)मुंबई/४०००८६ याठिकाणी आयोजित करण्यात आले होते.यावेळी रक्तदात्यांनी उस्फूर्त पणे सहभाग नोंदवून स्वइच्छेने रक्तदान केले.तसेच कोरोनाच्या अटीतटीच्या काळात आपल्या कर्तव्याचे निष्ठेने पालन करून, सामजिक दायित्व प्राणपणाने जपले त्याबद्दल त्यांच्याप्रती अभिमान व्यक्त करण्यासाठी आर.आर.पाटील फाऊंडेशनच्या वतीने श्री. विशाल गांधले, मा. श्रीमती. नयन ताई पारकर, प्रकाश भेकरे, पत्रकार शंत्ताराम गुडेकर,सुभाष कोकणे या कोरोना योद्धयांचा कोरोना वीर, छत्रपती शिवाजी महाराज सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी रक्तदान शिबीराला अनेक मान्यवरांनी भेट देऊन रक्तदात्यांचे मनोबल वाढवले. शिवाय हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी समता प्रतिष्ठान व पँथर राजाभाऊ गांधले सामजिक संस्थेचे संस्थापक शरद गांधले, मायक्रोलिंक फाऊंडेशनचे संस्थापक सचिन मनवळ सर तसेच इंदिरा नगर येथील अनेक युवकांनी कठोर परिश्रम घेतले.

टिप्पण्या