जिल्हास्तरीय नाईट अंडर आर्म क्रिकेट स्पर्धा करंबेळे-गोताड वाडी येथे उत्साहपूर्वक वातावरणात संपन्न

कोकण(एस.एल.गुडेकर) श्री धनिन आई युवा प्रतिष्ठान गोताड वाडी आयोजित श्री धनिन देवी युवा चषक २०२० चा मानकरी ठरला तो नाईन स्टार देवरुख संघ आणि उपविजेता नाईट क्लब वांझोळे तर तृतीय क्रमांक गावकर वाडी वांझोळे संघ ,मालिकावीर नाईन देवरुख संघाचा अभि तळेकर ,अंतिम सामन्याचा सामनावीर सोना ,उत्कृष्ट फलंदाज रोहन झोरे,उत्कृष्ट गोलंदाज मोईन,आदर्श संघ म्हणून महापुरुष देवरुख संघाला गौरविण्यात आले, सन्मानित संघ  बावनदी संघाला  गौरविण्यात आले.

तत्पूर्वी या स्पर्धेचे उदघाटन राजाराम गोताड, रमेश गोताड, गणपत गोताड,रामचंद्र दळवी व मंगेश पोमेंडकर यांच्या हस्ते झाले उदघाटन प्रसंगी  अनुराग कोचिरकर,सागर संसारे,सनी प्रसादे,अक्षय झेपले,संतोषशेठ (बंटी) गोताड व विजय करंबेळे साहेब उपस्थित होते.स्पर्धा यशस्वी करण्यात मोलाची कामगिरी बजावणाऱ्या पंचाचे विशेष आभार मानण्यात आले स्कोरर म्हणून प्रशांत गोताड तर संघ प्रवेश संपर्कसाठी सचिन गोताड यांनी जबाबदारी सांभाळली.या स्पर्धेसाठी मैदान राजाराम रावजी गोताड यांनी दिल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले.प्रथम क्रमांकाचे पारितोषिक  रोख रक्कम ३००१/-, नाभिक टायगर सेनेचे कोकण विभाग अध्यक्ष श्री प्रकाश(बबन)चव्हाण यांनी तर  प्रथम क्रमांक चषक संतोष उर्फ बंटीशेठ गोताड यांनी दिले .द्वितीय क्रमांकाचे चषक श्री अँड. अजय पाटील व रोख रक्कम २००१/- श्री छोट्या गवाणकर  यांनी दिले.तृतीय क्रमांकाचे पारितोषिक रोख रक्कम १००१/- आणि चषक प्रदीप ढवळ  यांनी दिले,आदर्श संघ चषक श्री जयराम(बावा) दळवी यांनी दिले,मालिकावीर चषक कु.सुरज गोताड,उत्कृष्ट फलंदाज  रमेश गोताड,उत्कृष्ट गोलंदाज  प्रशांत गुरव तर अंतिम सामनावीर मंगेश पोमेंडकर यांनी दिले.या व्यतिरिक्त रोख रक्कम देणारे दानशूर व्यक्तिमत्त्व जयराम दळवी, चंद्रकांत पाकतेकर, प्रदीप कांबळे, मंगेश तावडे, दिलिप सनगले यांचे सुद्धा विशेष आभार,स्पर्धेची उंची वाढवण्यासाठी व्यासपीठ आणि साउंड सिस्टम ची व्यवस्था करणारे  जयवंत पांडुरंग शिवगण यांचे सुद्धा मनस्वी आभार व्यक्त करण्यात आले.
           या स्पर्धेसाठी विशेष मेहनत घेणारे अजित गंगाराम गोरुले यांचे सुध्दा विशेष आभार मानले.स्पर्धेचे प्रमुख आयोजक रोशन गोताड, अमित रेवाळे, जितू दळवी, सुरज गोताड, रोहित गोताड, सचिन गोताड, प्रशांत गोताड, प्रतिक दळवी यांच्या आयोजनाचे कौतुक या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेल्या प्रत्येक संघाने केले,समालोचन ची जबाबदारी सुरज धावडे,ओम तसेच विभागातील समालोचकांनी  पार पाडली,सर्वात लहान क्रिकेटर म्हणून आणि उत्कृष्ट यष्टीरक्षण करणाऱ्या आर्यन तांदळे ला प्रोत्साहन म्हणून पुष्पगुच्छ आणि चेंडू देऊन गौरविण्यात आले.प्रथमच एखाद्या ग्रामीण भागात सलग दोन दिवस मध्ये ४८ संघ खेळवून त्यांचे शिस्तबद्ध नियोजन करून ही स्पर्धा यशस्वी केल्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच असे मत मांडले.या स्पर्धेसाठी गावातील ग्रामस्थांची विशेष उपस्थिती लक्षणीय होती त्याबद्दल आयोजकांच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले. श्री धनिन आई युवा प्रतिष्ठान चे कार्यकर्ते अमित रेवाळे, रोशन गोताड, जितेश दळवी, रोहित गोताड, सुरज गोताड, प्रशांत गोताड, प्रतिक दळवी, अभिषेक गोताड, सचिन गोताड, अंकेश गोताड , लवेश गोताड, राकेश गोताड, रितेश गोताड, सार्थक दळवी, सार्थक पोमेंडकर, नागेश गोताड इ.यांची उपस्थिती होती.

टिप्पण्या