ठाणे शहर पोलीस यांच्या संकल्पनेतून घेतलेल्या रक्तदान शिबीराला नागरिकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

 


पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचीही हजेरी

 ठाणे (प्रतिनिधी) राज्याचे मुख्यमंत्री श्री उद्दव ठाकरे यांनी नागरिकांना सढळ हाताने रक्तदान करण्याचे आवाहन केल्यानंतर  ठाणे शहर पोलीस आयुक्तालयामार्फत घेतलेल्या रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला आहे.ठाणे पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर यांनी आखलेल्या संकल्पनेला नागरिकांनी चांगला प्रतिसाद दिला.यावेळी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री श्री एकनाथ शिंदे यांचीही उपस्थिती लाभली.

 कोवीड - १९ या साथ रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी ठाणे शहर पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी आपला जीव धोक्यात घालून अत्यंत मोलाची कामगिरी बजावली . सदर , कोरोना या आजाराचा ठाणे आयुक्तालयातील १८७७ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना प्रादुर्भाव झाला . त्यातील एकुण ३२ पोलीस अधिकारी व अंमलदार यांना जीव गमवावा लागला . तर एकुण १८२३ पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कोरोनावर मात केली . कोवीड - १ ९ या साथीच्या आजारामुळे महाराष्ट्रातील रूग्णालयांमध्ये उपचार घेत असलेल्या रूग्णांना रक्ताचा मोठया प्रमाणात तुटवडा जाणवत असल्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री . उध्दवजी ठाकरे यांनी जनतेला मोठया प्रमाणात रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे . या आवाहनास सकारात्मक प्रतिसाद देत व नागरीकांना रक्तदान करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून मा . श्री . विवेक फणसळकर , पोलीस आयुक्त , ठाणे शहर यांचे संकल्पनेतुन ठाणे पोलीसाचे रक्तदान शिबीर सिध्दी हॉल येथे १ ) सामान्य रूग्णालय , ठाणे जिल्हा , २ ) छत्रपती शिवाजी रूग्णालय , कळवा व ३ ) ब्लडलाईन चॅरीटेबल ट्रस्ट यांचे सहकार्यातुन दिनांक १६/१२/२०२० रोजी सकाळी ११.०० ते सायं .५.०० वा . दरम्यान आयोजित करण्यात आले .

 या रक्तदान शिबीराला माननीय श्री . एकनाथजी शिंदे , पालक मंत्री , ठाणे जिल्हा तथा नगरविकास , सार्वजनिक बांधकाम ( सार्वजनिक उपकम ) मंत्री , महाराष्ट्र राज्य , मुंबई यांनी भेट दिली व रक्तदाते यांचे मनोबल उंचावले . तसेच मा . महोदयांनी पोलीस दलाने कोवीड - १ ९ चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या प्रशंसनीय कामगिरीनंतर मा . मुख्यमंत्री यांचे आवाहनाला प्रतिसाद देत पोलीसांनी आयोजित केलेले हे महाराष्ट्रातील प्रथम रक्तदान शिबीर असल्याने ठाणे पोलीसांचे कौतुक केले . या रक्तदान शिबीरासाठी मा.श्री . सुरेश कुमार मेकला , पोलीस सह आयुक्त , ठाणे शहर हे उपस्थित होते . या रक्तदान शिबीराचे नियोजन मा . श्री . प्रविण पवार , अपर पोलीस आयुक्त , प्रशासन , ठाणे शहर व मा . श्री . गणेश गावडे , पोलीस उप आयुक्त , मुख्यालय -२ , ठाणे शहर यांनी केले . या रक्तदान शिबीरामध्ये मोठया संख्येने पोलीस अधिकारी व अंमलदार तसेच महिला पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी रक्तदान करून सामाजिक बांधीलकीची जाणीव करून दिली . सदर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यासाठी श्री . सुभाष ढवळे , पोलीस निरीक्षक , मानवी संसाधन विभाग व श्री . सुभाष माने , राखीव पोलीस निरीक्षक , मुख्यालय , ठाणे व पोलीस अंमलदार यांनी मोलाची कामगिरी बजावली . सामाजिक बांधीलकीची जाणीव जपत भविष्यात देखील ठाणे पोलीस आयुक्तालयाचे विविध पोलीस परिमंडळाचे स्तरावर रक्तदान शिबीरे घेण्याचा मानस मा . पोलीस आयुक्त , ठाणे शहर यांनी व्यक्त केला .

टिप्पण्या