शहापूर तालुका काँग्रेस व डी वाय फाऊंडेशन आयोजित रक्तदान शिबीराला उत्स्फुर्त प्रतिसाद
शहापूर (एस.गुडेकर)
काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त शहापुर तालुका काँग्रेस पार्टी व डी वाय फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले.शहापुर तालुका काँग्रेस जनसंपर्क कार्यालयात तालुका काँग्रेस अध्यक्ष महेश धानके,डी वाय फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष दयानंद चोरघे यांनी आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिराचे उदघाटन काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष तथा ठाणे जिल्हा प्रभारी सुभाष कानडे,राष्ट्रवादी चे जिल्हा अध्यक्ष दशरथ तिवरे,डी वाय फाउंडेशन चे प्रदेश अध्यक्ष योगेश पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात आले,याप्रसंगी डी वाय फाउंडेशन चे संस्थापक व काँग्रेसचे जिल्हा नेते दयानंद चोरघे,जिल्हा उपाध्यक्ष विजय पाटील,काँग्रेस तालुका अध्यक्ष महेश धानके,बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष योगेश हजारे, आरपीआय चे अध्यक्ष केशव साबळे,जेष्ठ नेते दिलीप अधिकारी, गजानन बसवंत,अपर्णा खाडे,पद्माकर केव्हारी,आबा देशमुख,ऍड नारायण वेखंडे,रवींद्र परटोळे,रासपचे तालुका अध्यक्ष अरविंद निपुरतें ,संध्या पाटेकर,माया मगर,जितू विशे,पद्माकर वरकुटे, महेंद्र आरज,अंकुश भोईर,संतोष साळवे,झिपा वीर,लक्ष्मण निचिते,शांताराम धामणे,ज्ञानेश्वर धानके,आदी मान्यवर उपस्थित होते,तालुक्यातील ५५ रक्तदात्यांनी यावेळी रक्तदान केले,
रक्तदान शिबिरास तालुका आरोग्य अधिकारी डॉ तरुलता धानके,डॉ कर्पे, डॉ चव्हाण,कुणबी समाज संघाचे अध्यक्ष किशोर कुडव,सचिव पद्माकर पडवळ,जनकल्याण संस्थेचे सचिव रमेश वणारसे,व्यापारी मंडळाचे अध्यक्ष प्रकाश शहा,माजी अध्यक्ष सोमनाथ काबाडी, शिक्षक सेनेचे अरुण पाटील,जयवंत विशे, सुधीर भोईर,ग्रामविकास अधिकारी जगदीश मडके,जगदीश पवार,विष्णू शिर्के,गणेश चौधरी,पंढरी ढमके,किरण धुमाळ,संतोष ठाकरे यांनी भेट दिली,कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लक्ष्मण घरत,देवेन्द्र भेरे यांनी केले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा