मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व शिक्षण शुल्क परिक्षा शुल्क योजनेचे अर्ज भरण्याचे आवाहन
ठाणे : विमुक्त जाती भटक्या जमाती , इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया MAHADBT PORTAL वर दिनांक 15 डिसेंबर 2020 पासून सुरू करण्यात येत आहे. तरी विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्ज भरावेत.
सर्व अनुसूचित जाती प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांनी समाज कल्याण विभागाच्या सन 2020-21 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती, शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया MAHADBT PORTAL मध्ये सुरु करण्यात आलेली असून विद्यार्थ्यांनी तात्काळ अर्ज भरावेत.
शैक्षणिक वर्ष 2018-19 व 2019-20 या वर्षाचे MAHADBT PORTAL वर परिपूर्ण अर्ज भरूनही व समाज कल्याण विभागातर्फे अर्ज मंजूर असताना विद्यार्थ्याला त्याच्या प्रोफाइल मध्ये गेल्यानंतर पहिल्या व दुसऱ्या हफ्त्याची रक्कम वितरित झालेली असल्याचे दिसून येते परंतु त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही अशा विद्यार्थ्यांची यादी ते शिकत असलेल्या महाविद्यालयांना पाठविण्यात आलेली आहे तरी अशा विद्यार्थ्यांनी त्वरित महाविद्यालयाशी संपर्क साधावा. असे आवाहन ठाणे सहायक आयुक्त,समाज कल्याण बलभीम शिंदे यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा