इसवली-पनोरे गृप ग्रामपंचायतीवर शिवसेनेचाच भगवा फडकणार, इसवलीतील शिवसैनिकांचा निर्धार


 

लांजा (प्रतिनिधी) येत्या 15 जानेवारी रोजी लांजा तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका होत असून विविध जिल्हा परिषद गटातील ग्रामपंचायती आपल्या ताब्यात ठेवण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी यांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.या निमीत्ताने शिवसेनेचे लांजा संपर्कप्रमुख श्री जगदिश जूलूम यांनी लांजा तालुक्यातील पदाधिकारी,शिवसैनिकांच्या गाठी भेटी घेण्यास सुरवात केली आहे. या दौर्यादरम्यान इसवली येथील कार्यकर्त्यांची भेट घेतली असून ग्रामस्थांनी इसवली-पनोरे गृप ग्रामपंचायतीवर शिवसेनेचाच भगवा कायम डौलाने फडकत राहील असे आश्वासन दिले आहे.

 गेली अनेक वर्षे इसवली-पनोरे गृप ग्रामपंचायतील शिवसेनेचा झेंडा फडकत आहे.हा झेंडा उतरविण्यासाठी अनेक  पक्षांनी प्रयत्न केला मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आहेत.मनसेनेही प्रयत्न केला होता. येत्या 15 जानेवारी रोजी या ग्रामपंचायतीची निवडणुक होत आहे.कोरोनाच्या काळामुळे ही निवडणुक उशिरा होत आहे.राज्यात सध्या महाविकास आघाडी उदयास आली आहे.सध्याच्या परिस्थितीत इसवली ग्रामपंचायत कायमच शिवसेनेच्या ताब्यात राहीली आहे.महाविकास आघाडीमुळे तिन्ही पक्ष एकत्र लढल्यास पुढील काळातही ही ग्रामपंचायत शिवसेनेच्याच ताब्यात राहणार असल्याचे दिसून येत आहे.

 लांजा तालुका संपर्कप्रमुख श्री जगदिश जुलूम यांनी सध्या जिल्हा परिषद गटातील सर्व ग्रामपंचायतींतील पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्या भेटीगाठी घेण्यास सुरवात केली आहे.वाकेड जिल्हा परिषद गटात सभासद नोंदणी करणे,फार्म वाटप करणे,निवडणुक विषयावर चर्चा करणे तसेच विविध कामांचा आढावा घेतला जात आहे.यावेळी सर्व ग्रामस्थांकडून शिवसेनेचाच भगवा फडकणार असा निर्धार केला जात आहे. या दौऱ्यादरम्यान सहसंपर्क प्रमुख श्री रमेश आगरे,उपतालुका प्रमुख श्री सुरेश करंबेळे,उपविभाग प्रमुख श्री राजेंद्रजी पालये,विभाग संपर्क प्रमुख श्री सुभाष तांबे,वाकेड गावशाखा संघटक श्री सुनिल मोर्ये,तसेच श्री जितेंद्र कदम,राहुल जाधव,दिपक कदम,प्रकाश साळवी,विजय घोडेकर,सचिन नरसाळे,उत्तम शेलार,अनंत नरसाळे,प्रकाश मौर्ये,आनंद धारणकर,सुरेश मेस्त्री आदी आजीमाजी शिवसैनिक उपस्थित होते.

टिप्पण्या