नालासोपारा शहरातील नागिनदास पाडा येथील गरजूंना युवासेने कडून जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


नालासोपारा: हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिना प्रित्यर्थ, मंगळवार दि.१७/११/२०२० रोजी शिवसेना नालासोपारा शहरातील नगिनदास पाडा मधील गरजू जनतेस, युवासेनेचे शहर सचिव कू.नितेश नामदेव कुवेसकर व श्री. सूरज नामदेव कुवेसकर यांच्या संयुक्त विद्यमाने जीवनावश्यक वस्तूंचे (तांदूळ,गहू,डाळ,तेल) मोफत वाटप करण्यात आले.
   या वेळी माजी शाखाप्रमुख व बेस्ट कामगार सेनेचे पदाधिकारी श्री.संजीव नाईक,माजी शाखाप्रमुख श्री.नामदेव कुवेसकर, श्री. सतिश महाडिक, निलेश शिवतकर व विभागातील शिवसैनिक नागरिकानी उपस्थित राहून आयोजक कुवेसकर कुटुंबीयांचे आभार मानले. तर ऐन दिवाळीत एक मोठ सहकार्य व मदतीचा हात मिळालेल्या गरजुनी मनसोक्त आभार मानले.


टिप्पण्या