भडे येथे ग्रामपंचायत निवडणूक तृतीय वर्षपूर्ती कार्यक्रम उत्साहात,शिवसैनिकांकडून गावातील शाळेला संगणक संच भेट


लांजा (दिपक मांडवकर)  साधारणपणे एकदा निवडणूक झाल्यावर लोकप्रतिनिधी पुन्हा पाच वर्षाने मतदानासाठी लोकांच्या घरी जाताना दिसतात. साधक-बाधक कामे करत असताना ती लोकांपर्यंत वेळोवेळी न पोहोचता पुढील निवडणुकीतच वचनपूर्ती आणि जाहीरनामे यांची रेलचेल नेहमीच केली जाते. मात्र यास अपवाद ठरली आहे ती लांजा तालुक्यातील भडे ग्रामपंचायत.  तालुक्याच्या पश्चिमेस असलेल्या भडे ग्रामपंचायतीत शिवसेनेची एकहाती सत्ता आहे. जनतेतून थेट सरपंच निवडीचा गावात पहिला मान मिळवणारे भडे सरपंच सुधीर तेंडुलकर यांनी  ग्रामपंचायतीच्या कार्याचा ग्रामस्थांना प्रतिवर्षी दिलेला आढावा सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे. नुकतीच तीन वर्षे पूर्ण केलेल्या या ग्रामपंचायतीने आयोजित केलेला  संगीतरत्न  सन्मान सोहळा पंचक्रोशीत मार्गदर्शक बनला आहे. 
     कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासन नियमांचे पालन करीत गावातील आग्रे सभागृहात भरलेल्या संपन्न झालेल्या सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कोकण रत्न संतोष शिर्सेकर बुवा,  सागवे राजापूर यानी भूषविले. यावेळी माजी जिल्हा परिषद रत्नागिरी च्या अध्यक्ष स्वरूपा साळवी, पंचायत समिती लांजा चे माजी सभापती संजय नवाथे, लांजा तालुका शिवसेना उपतालुका प्रमुख सुरेश करंबेळे, स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष विनायक खान विलकर, आगवे येथील ज्येष्ठ शिवसैनिक मोरे, युवासेनेचे  रुपेश सूर्वे,  खानवली शाखाप्रमुख रवींद्र कानडे, उपसरपंच निलेश खानविलकर, बंडया सुर्वे, भडे ग्राम सेवा संघाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत जाधव, शिक्षक संदीप पावसकर, रवींद्र मांडवकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
      दरम्यान या कार्यक्रमाचे औचित्य साधून 'माझे कुटुंब माझी जबाबदारी 'या अभियानात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या आशा सेविका शिल्पा शांताराम दळवी, धनश्री संतोष आडविलकर यांना प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले. कोरोना कालावधीत उत्कृष्ट कार्य बजावलेल्या आरोग्यसेविका उपकेंद्र पुनस,  गाव भडेच्या सुप्रिया बोंबले यांच्यासह नवनियुक्त तलाठी अपूर्वा सुवरे ह्यांचा ग्रामपंचायतीच्या वतीने प्रोत्साहनपर सत्कार करण्यात आला. याच वेळी लांजा तालुक्याचे शिवसेना उपतालुका प्रमुख सुरेश करंबेळे यांनी आदर्श शाळा भडे नंबर 1 साठी संगणक संचाची देणगी प्रधान केली. प्रभारी मुख्याध्यापिका अक्षता रहाटे आणि सहकाऱ्यानी  त्यांचे विशेष ऋण व्यक्त केले.
        ग्रामपंचायत कारभाराच्या वर्षपूर्ती निमित्त प्रतिवर्षीप्रमाणे तिसऱ्या वर्षी आयोजित केलेल्या कार्यक्रमात संगीत क्षेत्रात योगदान देणाऱ्या गावातील संगीत रत्नांचा सत्कार करण्यात आला. ह्यामध्ये प्रकाश सुर्वे, अशोक सुर्वे, संजय सुर्वे ( भजनी बुवा), बबन काका तेंडुलकर (हार्मोनियम) राजेंद्र लिंगायत (तबलावादक) सदाशिव गितये  (पारंपारिक शिमगोत्सव )यशवंत खर्डे (तुतारीवादन) बाळू लिंगायत, आर. डी. लिंगायत (सनईवादन),  शाहीर सचिन खर्डे सोमेश्वर संगीत कलामंच यासह कै.  जाधव गुरुजी स्मरणार्थ मोहन जाधव यांना संगीतरत्न सन्मानचिन्ह, शाल प्रदान करून गौरविण्यात आले.
      महिलांसाठी आयोजित हळदी कुंकू समारंभात  कोरोना चा प्रादुर्भाव रोखण्याच्या हेतूने हँडवॉश वाटप करण्यात आले. दरम्यान ग्रामपंचायतीचा कारभार अधिक गतिमान व्हावा, वेळोवेळी ग्रामपंचायतीला ग्रामस्थांपर्यंत पोहोचणे सुलभ व्हावे, पेपरलेस कामाचा शुभारंभ व्हावा याकरिता ग्रामपंचायतीने 'भडे ग्रामपंचायत आपल्या दारी 'या व्हाट्सअप ग्रुप चा शुभारंभ केला.
            कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाखाप्रमुख संजीवकुमार राऊत,  उपसरपंच सदिच्छा नवाथे,  सदस्य संजय खर्डे, जयवंती खर्डे, सुप्रिया गितये, राजेश मयेकर, अक्षता चौगुले, एकनाथ तोस्कर,  ग्रामसेविका स्वाती महाजन, कर्मचारीवृंद ग्रामपंचायत,  तंटामुक्त समिती अध्यक्ष वासुदेव आग्रे , पोलीस पाटील नंदकुमार खानविलकर तसेच समस्त भडे परिवाराने अधिक परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आदर्श शिक्षक सुहास वाडेकर यांनी केले.


टिप्पण्या