प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेकरीता करारावर सागर मित्र भरती
ठाणे : सागरी जलक्षेत्रात पुरेपुर वापर करुन मत्सोत्पादनात वाढ करणे,मुल्यवर्धन व निर्यात मुल्यात वाढ करणे,जलक्षेत्राची सरासरी उत्पादकता वाढविणे आणि काढणीपश्चात नुकसान कमी करणे याद्वारे एकूणच राष्ट्रीय दरडोई उत्पादन वाढ करणे.या करीता केंद्र शासनाने महत्वाकांक्षी प्रधानमंत्री मत्ससंपदा योजना मंजुर केली आहे.सदर योजनेच्या सुसुत्रीकरण व समन्वयकरीता ठाणे या सागरी जिल्ह्यांमध्ये सागर मित्र या अभियानाची 05 पदे 11 महिने या कालावधीकरिता निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात मानधनावर भरावयाची आहेत.
उमेदवार हा पदवीधर असावा,स्थानिक भाषांचे ज्ञान असावे,स्थानिक ठिकाणी वास्तव्यास असणारे उमेदवारांस प्राधन्य ,अर्जदार चे 35 वर्षा पेक्षा जास्त नसावे.दरमहा एकत्रित मानधन रु 10000/- हजार रुपये,(उल्लेखनिय/उत्कृष्ट कामांस अतिरीक्त मानधन रु.5000/- अनुज्ञेय राहील.कामाचे ठिकाण ठाणे जिल्ह्यातील डोंगरी चौक,उत्तन,उत्तन भाटये, वाशी ब्रिज,दिवाळे,असे आहे.सागर मित्र नियुक्ती ही योजना कालावधीसाठी निव्वळ तात्पुरती नियुक्ती असून योजना संपल्यावर सदर नियुक्ती आपोआप संपुष्टात येईल.तसेच या आधारे अर्जदारास भविष्यात शासकीय नोकरीचा कोणताही दावा करता येणार नाही.मुलाखतीसाठी येणे व जाणे यासाठी कोणताही भत्ता अनुज्ञेय असणार नाही.
इच्छुक अर्जदारांनी शैक्षणिेक पात्रता,वय(जन्मतारीख),रहिवास व अनुभवाच्या पुरावा तसेच संपर्क ई-मेल व दुरध्वनी क्रमांकासह आपला अर्ज 26 नोव्हेंबर 2020 वा तत्पुर्वी sangamitra.thane@gmail.com या मेलवर पाठवा.
कार्यालयाचा पत्ता-सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (ता),ठाणे पालघर यांचे कार्यालय,4 रॉयल पॉईट-2 जुना तळवलकर हॉल,कचेरी रोड,पालघर(प)-401404 असा आहे.अधिक माहिती या https://nfdb.gov.in/guidline संकेत स्थळावरवर उपलब्ध संपर्क करावा असे आवाहन सहाय्यक आयुक्त मत्स्यव्यवसाय अधिकारी ठाणे-पालघर आनंद पालव यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा