शासकीय कार्यालयांना अंनिसने दिली संविधान भेट
खेड : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती रत्नागिरी यांच्या मार्फत २६ नोव्हेंबर २०२० ते २६ जानेवारी२०२० असा संविधान बांधिलकी महोत्सव साजरा केला जातो. यांच कार्यक्रमाची सुरवात म्हणून आज खेड तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालयांना अंधश्रद्धा निर्मूलन समिती जिल्हा कार्यअध्यक्ष सचिन गोवळकर यांच्या हस्ते संविधान भेट देण्यात आले.यावेळी अंनिसचे बुवाबाजी संघर्ष प्रमुख संदिप गोवळकर, शाखा कार्यअध्यक्ष सचिन शिर्के,वैज्ञानिक जाणिवा प्रकल्प संदिप बडबे, रोहिणी अवघडे आदी मान्यवर सोबत होते.
आमदार योगेश कदम साहेब,-263 दापोली-खेड-मंडणगड विधानसभा संघ, अविशकुमार सोनोने साहेब- उपविभागीय अधिकारी खेड , तहसीलदार प्राजक्ता घोरपडे मॅडम, पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की मॅडम, गटविकास अधिकारी खेड अरुण जाधव साहेब, मुख्याधिकारी नगर परिषद खेड प्रसाद शिंगटे साहेब, गट शिक्षण अधिकारी श्रीधर शिगवण, तालुका कृषी अधिकारी उत्तम संघभोर या अधिकाऱ्यांनी संविधान देण्यात आले.
यावेळी माध्यमाशी बोलताना अंनिस जिल्हा कार्य अध्यक्ष श्री.सचिन गोवळकर म्हणाले की, आपला देश हा संविधानानुसार चालतो. हे संविधान जन मानसात रुजवण्याची जबाबदारी व संविधान प्रमाणे सर्व जनतेला न्याय देण्याची जबाबदारी ही शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची आहे.त्यामुळे आजचा दिवस हा सर्वांसाठी महत्वाचा आहे.
अंनिसने वित्तीय साक्षरता केंद्रला भेट देऊन तेथील कर्मचारी यांना अंनिसचे संदिप गोवळकर यांनी संविधान आपली जबाबदारी व आपली कर्तव्ये समजवून सांगितले.
या वेळी माध्यमांशी बोलतांना अंनिस शाखा खेड चे वैज्ञानिक जाणीवा प्रमुख संदीप बडबे म्हणाले की संविधानामुळे सर्व नागरिकांना समान नागरी हक्क, अभिव्यक्ती स्वातंत्र्य, समता, बंधुता, मिळाले आहे म्हणून सर्वानी संविधानाचा आदर केला पाहिजे व कृती केली पाहिजे.
यावेळी माध्यमाशी बोलताना अंनिस खेड शाखेचे कार्यअध्यक्ष श्री. शिर्के म्हणाले की, देशातील प्रत्येक नागरिकांसह समानतेची शिकवण त्याच बरोबर आपले हक्क आणि कर्तव्य या विषयावर जागरूकता प्रत्येक नागरिकाने बालगली पाहिजे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा