आदीवासींना जातचोर आणि बोगस शब्द वापरल्यामुळे आफ्रोहकडून वृत्तपत्राची होळी



जनतेच्या भावना दुखावल्याबद्दल वृत्तपत्राची होळी


ठाणे – वृत्तपत्रात बातमी छापताना एका दैनिक वृत्तपत्राने आदीवासी बांधवांना उद्देशून जातचोर आणि बोगस हे शब्द वापरल्यामुळे तमाम आदिवासी बांधवांची मने दुखावली आहेत.एकीकडे आदीवासी बांधव न्यायासाठी झगडत असताना दुसरीकडे त्यांचे खच्चीकरण करणे या वृत्तपत्राने ठरविल्यामुळे १ नोव्हेंबर रोजी अर्गनायझेशन फोर राईट्स ट्रायबल (ओफ्रोह) या संघटनेच्यावतीने साईचौक, खडकपाडा, कल्याण (पश्चिम) येथे होळी करण्यात आली.


  यावेळी वृत्तपत्राने बातमी छापताना जातचोर आणि बोगस शब्द उल्लेख केल्यामुळे तीव्र निषेध करण्यात आला.यावेळी श्री. अर्जुन भोईर, नगरसेवक (खडकपाडा), कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील आदीवाशी कर्मचारी, तसेच अन्यायग्रस्त कर्मचारी मोठया संख्येने, खडकपाडा आफ्रोहचे अध्यक्ष दयानंद कोळी, उपाध्यक्ष ग्यानदेव निखारे व संघटनेचे पदाधिकारी सदस्य उपस्थित होते.यावेळी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.


टिप्पण्या