राजापूर तालुका कोरोनामुक्त,आमदार डाॅ.राजन साळवी यांनी केला कोरोना योद्धा प्रशासकीय अधिकाऱ्यांचा सत्कार
रत्नागिरी (ह्रषिकेष सावंत) रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना संक्रमण वाढत असताना राजापूर तालुक्यात कोरोना संकमण आटोक्यात शुन्यावर आले आहे.राजापुर तालुका कोरोनामुक्त करण्यास दिवसरात्र राबणाऱ्या अशा प्रशासकीय कोरोना योद्धांचा राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी व राजापूर तालुका प्रेस क्लब च्या वतीने सन्मान करण्यात आला आहे.
राजापूर तालुक्यात मे महिन्या पासून कोराना ने शिरकाव केला. त्यानंतर मागील पाच महिन्यात तालुक्यात कोरोनाचे ३२८ रूग्ण सापडले आहेत. यापैकी १५ जणांचा मृत्यू झाला असून ३१३ रूग्ण उपचारा अंती बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत तालुक्यातील उपचाराखालील रूग्णांची संख्या शुन्य झाली आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात राजापूर तालुका प्रशासनाने चांगले काम केल्याबद्दल राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी यांच्या हस्ते राजापूर तहसीलदार सौ. प्रतिभा वराळे, गटविकास अधिकारी सागर पाटील, राजापूर पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर, नगरपरिषद मुख्याधिकारी देवानंद ढेकळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ विजय साबळे व ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.राम मेस्त्री यांचा सत्कार करण्यात आला.
सद्यस्थितीत कोरोनाबाधितांची संख्या शुन्य झाली असल्याने आता आपली जबाबदारी अधिक वाढली आहे. आगामी दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर संक्रमण वाढू नये याकरीता प्रशासनाने सतर्क रहावे, अशा सूचना राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ.राजनजी साळवी ह्यांनी यावेळी दिल्या. त्याप्रसंगी प्रेस क्लबचे सल्लागार महेश शिवलकर, विनोद पवार, सचिव राजेंद्र बाईत, सदस्य संतोष मोंडे, प्रकाश नाचणेकर, राजू जोगळे आदी मान्यवर उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा