सर्पदंशामुळे मृत्यु झालेल्या लांबोरे कुटूंबियांच्या मदतीसाठी शिवसेना लांजा संपर्क प्रमुख जगदिश जुलूम यांनी घेतली खासदारंची भेट


लांजा (प्रतिनिधी ) शिवसेना लांजा मुंबई कार्यकारणी यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे खासदार शिवसेना सचिव विनायकजी राऊत यांची सदिच्छा भेट घेत लांजा तालुक्यातील लांबोरे यांच्या सर्पदंश मृत्यू प्रकरणी त्यांचा कुटूंबियांना लवकर मदत मिळावी म्हणून प्रयत्न करावा अशी लांजा संपर्क प्रमुख श्री जगदीश जुलूम यांनी विनंती केली.यावेळी खासदार विनायक राऊत यांनी लांबोरे कुटूंबियांना लवकरच मदत करु असे सांगितले आहे.


   यावेळी खासदार विनायक राऊत यांनी लांजा बीडीओ यांना लांबोरे कुटूंबियांच्या घरासाठी योग्य तो प्रयत्न करावा असे ही सूचित केले आहे.लांबोरे यांना सर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यु झाला होता.त्यांच्या पश्चात मुले,आईवडील,बायको असा परिवार आहे.मात्र लांबोरे यांच्या जाण्यामुळे कुटूंबाचा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.त्यांचे कुटूंबिय ज्या घरात राहतात ते कच्चे व धोकादायक असल्याने खासदार राऊत यांनी त्यांच्या घरासाठी तातडीने प्रयत्न करावेत अशी सूचना केली आहे.


    यावेळी तालुका प्रमुख (मुंबई) श्री शंकरजी मांडवकर साहेब, सहकार विभागाचे विलास पातेरे , विभाग संपर्क प्रमुख मनोहर लंबोर , सुभाष तांबे ,  उपविभाग संपर्क प्रमुख श्री चंदू काळे, चंद्रकांत नामये, विजेंद्र पालये , सोबत मनोज चांदूरकर , विलास पडियार, हरिश्चंद्र मांडवकर, संदेश माजळकर हे उपस्थित होते.


टिप्पण्या