भाजपाचे श्री महेश मोरे यांच्याकडून कर्तव्यदक्ष वैद्यकिय अधिकारी डाॅ सुनिता उबाळे यांचा सन्मान


ठाणे (प्रतिनिधी) भिवंडी अंजूरफाटा येथून छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रसुतीसाठी आलेल्या एका भारती नामक महिलेला दवाखान्यात दाखल करण्यास काही मुजोर कर्मचाऱ्यांमुळे उशिर झाला होता.मात्र आपल्या भुमिकेवर ठामपणे राहून आपल्या सर्वप्रथम कर्तव्यदक्षतेची पोचपावती देवून महिलेवर यशस्वी शस्त्रक्रिया करुन पुनर्जन्म दिल्याबद्दल नुकतेच येथील वैद्यकिय अधिकारी डाॅ सुनिता उबाळे यांचा भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडीचे कोकण विभाग सरचिटणीस श्री महेश मोरे यांनी विशेष सन्मान केला आहे.


 भिवंडीतील इंदिरा गांधी रुग्णालयात प्रसुतीच्या सुविधा नसल्याने भारती नामक महिलेला ठाणेतील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय गाठावे लागले होते.मोठे अंतर असल्याने प्रवासातही मोठा आणि नाहक त्रास सहन करावा लागला होता.तसेच प्रसुतीच्या कळा असताना येथील काही मुजोर कर्मचाऱ्यांनी दाखल करण्यास विलंब केला होता.या दरम्यान येथील रात्रपाळीवर ड्युटीवर असणाऱ्या आरोग्य कर्मचारी सुनिता उबाळे यांनी परिस्थितीचे भान राखून सदर महिलेस तात्काळ दाखल केले आणि यशस्वी शस्त्रक्रिया केली होती. महिलेने एका गोंडस बाळास जन्म दिला आहे.महिलेच्या नातेवाईकांनी सुनीता उबाळे यांचे आभार मानले आहेत.सुनीता उबाळे यांच्या कार्याची दखल घेत श्री महेश मोरे यांनी हास्पीटला भेट देवून डाॅ उबाळे यांचा विषेश सन्मान केला आहे.


टिप्पण्या