तहानलेल्यांसाठी देवदूत ठरणाऱ्या ठाण्यातील भाजपचे श्री महेश मोरे यांना ठाणेकरांचा सलाम
ठाणे ( प्रतिनिधी) परिस्थितीने माणसाला खूप काही शिकवले जाते. कमी शिक्षण किंवा घरात दारिद्र्य असल्याने खडतर आयुष्यच नशिबी येते. त्यामुळे पोटाची खळगी भरण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. प्रसंगी रस्त्यावर राहण्याची तयारी ठेवावी लागते. ठाण्यात दिवाळीनिमित्ताने कंदील, पणत्या विक्रीसाठी विक्रेते येतात. या वस्तू विकून चार पैसे गाठीशी घेऊन ही मंडळी पुन्हा गावाला परततात.अशा या दिवसभर रस्त्याच्या कडेला, तासनतास उन्हात बसणाऱ्या,तहानलेल्यांच्या पोटात एक थेंब जावा यासाठी रस्त्यावरील विक्रेत्यांना पाणी बोटलचे वाटप करणारे ठाण्यातील भाजपनेते श्री महेश मोरे देवदूत ठरले आहेत.
भुकेलेल्यांना अन्न आणि तहानलेल्यांना पाणी देणं हा भारतीय जनता पक्षाचे कामगार आघाडीचे सरचिटणीस श्री महेश मोरे यांच्या जीवनाचा भागच बनला आहे.पुर्वी कोरोनाच्या संकटात सापडलेल्यांना धान्य वाटप करणे,दर दिवशी अन्नदान करणे याशिवाय अनेक समस्या त्यांनी सोडविल्या आहेत.तश्याच प्रकारच्या समस्या सध्या कोरोनामुळे बेरोजगार झालेल्या,पोटाची खळगी भरण्यासाठी दुरचा प्रवास करुन ठाण्यात येणाऱ्या लोकांसाठी पाण्याचा थेंब मिळावा यासाठी त्यांनी धडपड चालू केली आहे.आपल्या सहकार्यांसमवेत त्यांनी ठाणे परिसरात उन्हातान्हात रस्त्यावर दिवाळीच्या वस्तू विकण्यास बसलेल्या हजारो लोकांना त्यांनी पाण्याच्या बोटल वाटप केल्या आहेत.
यंदा कोरोना पसरल्याने आदीवासी गावांतून येणाऱ्या नागरिकांच्या वस्तूंच्या विक्रींवर मोठा परिणाम झाला आहे. गर्दी करण्याचे बंधन असल्याने दिवाळीपुर्वी बाजारात येणाऱ्या वस्तूही यावेळे विकायच्या की नाहीत असा प्रश्न या मंडळींना पडला होता.ठाण्यात कुठलाही माणूस आली तरी तो उपाशी राहत नाही. काहीना काहीतरी काम मिळवून आपल्या पोटाची खळगी भरतो. त्यासाठी त्याची कितीही कष्ट घेण्याची तयारी असते. ठाण्यातही दिवाळीच्यावेळेस स्टेशन परिसरात कंदील, पणत्या विकण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून विक्रेते येतात. या विक्रेत्यांचा संसार रस्त्यावरच थाटलेला असतो. अनेक अडीअडचणी आल्यातरी त्याला सामोरे जात ते आपला व्यवसाय करत असतात. ठाणेकरांची घरे दिव्यांनी उजळून टाकणारे मात्र अंधारातच चाचपडत असतात.
दुकानांची पायरी किंवा ओटा हेच त्यांचे घर होऊन जाते. दिवसभराच्या काबाडकष्टानंतर चार घास पोटात ढकलून तिथेच अंग आडवे करतात. यंदा मात्र कोरोनाने पाय पसरल्याने विक्रेत्यांचा हिरमोड झाला. कोरोनामुळे ग्राहक पाठ फिरवत आहेत.ठाणे नौपाडा,जांभळीनाका स्टेशनरोड परिसरात ते ज्या पद्धतीने राहतात हे पाहून मनाला वेदना होतात. श्रीमंती आणि गरिबी यातील दरी यातून दिसून येते. यंदाही ठाण्यात महाराष्ट्रातून विक्रेते ठाण्यात आले होते. मात्र उन्हाच्या कडाक्यामुळे त्यांना असह्य त्रास होत होत्या.
उत्सवाच्या काळात आपला संसाराचा गाडा हाकण्यासाठी खेड्यापाड्यातून कुुटुंब शहरात उदरनिर्वाहासाठी दरवर्षी येत असतात. गावी हाताला काम नसल्याने शहरात येऊन चार पैसे मिळतील या उद्देशाने अनेक कुटुंब सण, उत्सवाच्या काळात ठाण्यात तात्पुरते स्थलांतरीत होताना दिसतात. दिवाळीत तर पदपथापासून अगदी दुकानांच्या कडेकडेला हे कुटुंब वस्तू विकताना दिसतात. 'दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा' या उक्तीप्रमाणे त्यांचीही दिवाळी आनंदाची करण्यासाठी छोट्या छोट्या वस्तू जशा पणती, कंदील विक्रीसाठी ही मंडळी घेऊन बसतात. या कुटुंबांची दिवाळी ही दिवाळीनंतर दिवाळी असते असे म्हणायला हरकत नाही. गावी रोजगार नसल्याने यंदा विविध ठिकाणाहून कुटुंबाची कुटुंब ठाण्यात आले होते. जांभळी मार्केट, संपूर्ण राममारुती रोड, गोखले रोड, तलावपाळी याठिकाणी कोपऱ्यात, पदपथावर, दुकानाच्या आडोशाला ही मंडळी विक्री करताना दिसून येतात. भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडीचे सरचिटणीस श्री महेश मोरे यांच्या कार्याला ठाणेकरांनी सलाम ठोकला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा