श्री नवलादेवी क्रिकेट क्लब आयोजित ॲानलाईन एकपात्री अभिनय स्पर्धेचा निकाल जाहीर
लांजा (प्रतिनिधी ) तालुक्यातील श्री नवलादेवी क्रिकेट क्लब इसवली पाथरवाडीतर्फे घेण्यात आलेल्या ॲानलाईन एकपात्री अभिनय स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून तालुका मर्यादित घेण्यात आलेल्या स्पर्धेत कु.आश्विनी अमोल रेडिज हिने प्रथम क्रमांक तर गाव मर्यादित असलेल्या स्पर्धेत कु.सारंगी संतोष राजये हिने प्रथम क्रमांक पटकाविला आहे.
मागील महिन्यात लांजा तालुक्यातील श्री नवलादेवी क्रिकेट क्लब इसवली पाथरवाडीतर्फे तरुणांना अभिनय क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी ॲानलाईन एकपात्री अभिनय तालुका व गाव स्तरातील स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.स्पर्धेचे आवाहन केल्यानंतर तालुकाभरातून अनेकांचे एकपात्री अभिनय असल्याचे व्हिडीओ पाठविण्यात आले होते.या स्पर्धेतून तालुका मर्यादित असलेल्या स्पर्धेत प्रथम क्रमांक – अश्विनी अमोल रेडीज,द्वितीय क्रमांक – आर्यन अनिल कासारे तसेच गाव मर्यादित अभिनय स्पर्धेत – प्रथम क्रमांक – कु.सारंगी संतोष राजये,द्वितीय क्रमांक – वैष्णवी रविंद्र नरसळे,तृतीय क्रमांक – आदित्य अजय ठिक,उत्तेजनार्थ – सुदिक्षा संतोष राजये यांची निवड करण्यात आली आहे.
यशस्वी स्पर्धकांचे मंडळातील सर्व सदस्यांनी,तालुकाभरातून कौतूक होत आहे.स्पर्धेचे परिक्षक म्हणून ऋषिकेश शिंदे व प्रथमेश मांडवकर यांनी काम पाहीले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा