रुग्णाचा पैश्यांअभावी रिपोर्ट देण्यास टाळाटाळ करणाऱ्या डाॅक्टरला भाजपाचे महेश मोरे यांचा दणका
उपचार शुन्य आणि बिलाची रक्कम दामदुप्पट,भाजपा दणका
ठाणे (प्रतिनिधी) दुसऱ्या दवाखान्यात दाखल करण्यास रुग्णास तातडीची गरज असताना पुर्ण पैसे भरल्याशिवाय रिपोर्टच देणार नाही अशी तटस्य भुमिका घेवून रुग्णावर चांगला उपचार न करताही दामदुप्पट बील लावून वसुली करणाऱ्या आणि डिस्चार्ज न देणाऱ्या डाॅक्टरला अखेर भारतीय जनता पार्टीचे कामगार आघाडीचे कोकण सरचिटणीस श्री महेश मोरे यांचा दणका मिळताच रिपोर्ट हातात मिळाला.हा प्रकार ठाणे शहरातील हायलॅंड मल्टीस्पेशालिस्ट हास्पीटल येथे घडला.रुग्णाच्या नातेवाईकांनी महेश मोरे यांच्या सहकार्याबद्दल आभार मानले आहेत.
सामान्य नागरिक रुग्ण खात्रीलायक बरा होईल यासाठी उपचारासाठी हाॅस्पीटलमध्ये दाखल करतात.मात्र त्यांच्या परिस्थितीचा फायदा घेत काही डाॅक्टर रुग्णांचे काहीतरी बरे वाईट होईल अशी भीती दाखवून फायदा घेत लाखोंची फि वसुली करीत असतात.या फि वसुलीसाठी पेशंटचा जीव गेला तरी बेहत्तर मात्र आपली फि वसुली झाल्याशिवाय डिस्चार्ज द्यायचा नाही असे प्रकार वैद्यकिय क्षेत्रात सध्या सुरु आहेत.असाच प्रकार ठाण्यातील नामांकित हायलॅंड मल्टीस्पेशालिस्ट हाॅस्पीटलमध्ये घडला आहे.भिवंडीतून जबर मारहाण झालेला पेशंट ठाण्यातील या दवाखान्यात दाखल झाला.गेले 8 दिवस त्याच्यावर उपचार केल्याचे समजते.त्याच्यावर उपचारांचा कोणताच फरक पडला नाही.तब्बेत आणखीणच बिघडली.त्यामुळे दुसऱ्या हाॅस्पीटलला दाखल करण्यासाठी येथील हाॅस्पीटलकडून कोणते उपचार करण्यात आले? त्याचा रिपोर्ट मिळणे गरजेचं होता.यासाठी डाॅक्टरांकडे वारंवार विनंती करण्यात आली. मात्र पहिले बिल भरा मगच तुम्हास रिपोर्ट मिळेल अशी तटस्य भुमिका घेतली होती.त्यामुळे इतर रुग्णालयात रुग्णास दाखल करण्यासाठी अडचण येणार होती.
उपचार शुन्य आणि एकूण बिल ८५ हजार रुपये झाले.मात्र कोणताही अंदाजही नसणाऱ्या शाबाज सुल्तान मोमीन यांच्या कुटूंबियांकडे मोठ्या रकमेचं बिल हातात पडले. त्यांच्यापुढे एवढी मोठी रक्कम भरायची कशी असा प्रश्न निर्माण झाला होता. या बिलोपोटी त्यांनी सुरवातीला 6० हजार रुपयांची रक्कम भरली होती.मात्र तरीही डाक्टर पुर्ण रक्कम भरण्यासाठी रुग्णास डिस्चार्ज देण्यास तयार नव्हता.
सुलतान यांच्या कुटूंबियांची परिस्थिती लक्षात घेता नाजूक होती.त्यांच्याकडे पैसै उपलब्ध नव्हते.त्यामुळे रुग्णास इतर ठिकाणी दाखल करता येत नव्हते रुग्णाची परिस्थिती गंभीर होत चालली होती. दरम्यान मुंब्रा येथील भारतीय जनता पार्टीचे अल्पसंख्याक ठाणे जिल्हा उपाध्यक्ष तौफिक शेख यांनी श्री महेश मोरे यांच्याशी संपर्क साधला.दरम्यान महेश मोरे यांचा हास्पीटल प्रशासनाला दणका मिळताच कुटूंबियांना रिपोर्टसह डिस्चार्जही देण्यात आला.त्यामुळे महेश मोरे यांनी सामान्य कुटूंबाला दाखविलेल्या तत्परतेबद्दल आभार मानले आहेत.तसेच कुटूंबियांना सहकार्य करण्यास कामगार आघाडीचे पदाधिकारी श्री सुनिल तिवारी यांनीही योगदान दिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा