कोचिंग क्लासेस संचालक संघटनेच्यावतीने कोविड तपासणी शिबीराचे आयोजन
ठाणे : ( प्रतिनिधी )कोचिंग क्लासेस संचालक संघटनेने आतापर्यंत नेहमीच शासन यंत्रणेवर विश्वास ठेवून, शासनास सहकार्य केलेले आहे. १७ मार्च रोजी स्वतः संघटनेने लॉकडाऊन जाहीर केला व आजही क्लासेस संचालक हे शासनास सहकार्य करत आहेत. उपासमार टाळावी म्हणून,क्लासेस संचालक स्वतः इतर छोटे मोठे उद्योग करून, ७|८ महिने क्लासेस बंद असल्यामुळे, कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. क्लासेस गाळा भाडे, थकित वीज बिल व शिक्षक वर्गाचे पगार या सर्व गोष्टींनी क्लासेस संचालकाचे पूर्ण कंबरडे मोडलेले आहे. परंतु शासनाने ९ वी ते १२ वीच्या शाळा चालू करणार, असे जाहीर केल्याने, मोठ्या अपेक्षेने पुन्हा कंबर कसून, शासनास सहकार्य करूनच, नियमाने आपलले उपजीविकेचे साधन चालू करण्यास मिळणार, हि आशा बाळगतो आहे. क्लासेस मध्ये येणारे विद्यार्थी, हे परक्याचं धन आहे, परंतु तिच माझी लक्ष्मी आहे. ते माझेच बाळ आहे हेच आतापर्यंत सदैव विचार करत आला आहे. म्हणून विद्यार्थी सुरक्षेला प्रथम प्राधान्य देत, कुटुंबाचा विरोध पत्करूनही, अनेक क्लासेस संचालकांनी व शिक्षकांनी आज स्वतःची कोविड टेस्ट करून घेतली.
कोरोनासंदर्भात समाजात अनेक चांगल्या वाईट समजूती आहेत. तरीसुद्धा हा आपल्या संघटनेचा उपक्रम आहे व आपल्या साठी उपक्रम आहे,हाच विचार मनात ठेवून,अपेक्षेच्या तिप्पट पटिने क्लासेस संचालक व शिक्षक यांनी वेळ काढून उपस्थिती दर्शविली. शिक्षक शक्तीचे संस्थापक अध्यक्ष राकेश तोमर सर व
संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतिश देशमुख,उपाध्यक्ष प्रकाश पाटील,सचिव सचिन सरोदे, खजिनदार सुनील सोनार,उपकार्याध्यक्ष रवींद प्रजापती,राज्य कार्यकारिणी सदस्य विनायक चव्हाण, भरत जगताप, शैलेश सकपाळ,आनंदा जाधव,अन्वर सय्यद, बबन चव्हाण,मिलिंद मोरे,संतोष गोसावी, ज्ञानेश्वर मांडवे,सुधेश अरगोडा,आनंद भोसले, सागर चिचकर,पूर्वा माने, सुबोध मालकर तसेच विविध विभागातील प्रतिनिधी सचिन पाटील,सुधीर नवले,सुदाम केदार,प्रकाश पाटील, मुकुंद कोकाटे,परेश कारंडे, पत्रकार अर्जून चेमटे अशा अनेक मान्यवरांनी स्वतः कोविड टेस्ट करून घेतली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा