आ.मुजफ्फर हुसैन यांच्या विधान परिषदेवरील निवडीमुळे वसईतील काॅंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह
पक्षाचा सामान्य कार्यकर्ता ते आमदार आणि प्रदेश काँग्रेसचे कार्य. अध्यक्ष
मुजफ्फर हुसैन यांचा राजकीय प्रवास कार्यकर्त्यांना उभारी देणारा
वसई : मुजफ्फर हुसैन यांची नुकतीच पुनः विधान परिषदेवर निवड झाली आहे. त्यामुळे वसई विरार मधील तरुण कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाला उधाण आले आहे. वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसच्या संघटनात्मक बांधणीमध्ये मुजफ्फर यांचा सिंहाचा वाटा आहे. मागील ३० वर्षे ते या भागातील पक्षाच्या कामकाजाविषयी जवळून अभ्यासपूर्ण मार्गदर्शन देण्याचा कार्य करून येणाऱ्या काळात कोकणाबरोबरच वसई विरार जिल्हा काँग्रेस आणि पालघर जिल्हा काँग्रेस वाढीसाठी वैयक्तिकरित्या प्रयत्न करीत आहेत.
मागील महिन्यातच त्यांनी येथील सर्व ब्लॉक कमिट्यांना सदिच्छा भेटी देऊन कार्यकर्त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. विधान परिषदेवर मुजफ्फर हुसैन यांची निवड झाल्याने वसई विरारमधील कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे अशी भावना जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी व्यक्त केली आहे. राजकीय क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय असून कोरोना संकटाच्या काळात त्यांनी सुमारे ३५ हजार लोकांना अन्न धान्याचे किट्स वाटप केले. बिहार, उत्तर प्रदेश, जम्मू आदी प्रदेशातल्या श्रमिक मजुरांना रेल्वेद्वारे त्यांच्या गावी सुरक्षितरीत्या जाता यावे यासाठी मुजफ्फर भाईंनी समन्वयकाची भूमिका बजावली. लॉकडाऊनच्या काळात २४ तास सेवा देणारे मदत केंद्र उभारून माणुसकीचे दर्शन त्यांनी घडवले. एक जबाबदार नागरिक म्हणून विविध सामाजिक उपक्रम राबविताना त्यांनी नियमित सातत्य राखले. सन २०११ साली त्यांनी आपल्या आमदार निधीतून ५० खाटांचे अद्ययावत हॉस्पिटल उभे केले. त्यामध्ये एक्सरे युनिट, मॅटर्निटी वॉर्ड, प्राथमिक तपासणी केंद्र, शस्त्रक्रिया विभाग, पॅथॉ लॅब आदी वैद्यकिय सोयी सुविधांचा अंतर्भाव आहे. तसेच रुग्णांना लाभ घेता यावा यासाठी त्यांनी १०० चौरस कि.मी. परिसरात राजीव गांधी ब्लड बँक उभारली आहे अशी माहिती ओनील आल्मेडा यांनी दिली आहे. मुजफ्फर हुसैन यांनी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, मी धर्मनिरपेक्ष, शिक्षण क्षेत्रास प्रोत्साहन देणे आणि समतोल विकास ही त्रिसूत्री उराशी बाळगून आजतागायत तिचा अवलंब करीत आहे. खरे म्हणजे मी प्रथम सामान्य कार्यकर्ता नंतर उद्योजक असून त्याद्वारेच मला जनसेवेची संधी मिळाली. गरजू आणि दिनदुबळ्यांचे प्रश्न समजले. त्यांच्या सोडवणुकीसाठी मला प्रयत्न करता आले हे माझे भाग्यच समजतो असे उद्गार मुजफ्फर हुसेन यांनी काढले. यापुढेही हा असाच प्रवास सुरु राहील असेही ते शेवटी म्हणाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा