योगिता हिरवे जोगेश्वरी पूर्व येथील शिक्षिका यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने जेष्ठ नागरिकांना दिला मदतीचा हात
मुंबई(शांत्ताराम गुडेकर) कोविड-१९ या महामारी काळात प्रत्येकजण आपआपल्या परीने जी काही मदत करता येईल ती करत होता.योगिता हिरवे जोगेश्वरी पूर्व येथील शिक्षिका यांनी आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने जेष्ठ नागरिकांना साखर,चहापावडर,साबण,कोलगेट तेल व मास्क भेट म्हणून दिले.त्यांनी आवश्यक तेथे जी-जी गरज होती तेथे तेथे गरजेनुसार मदतीचा हात यापुर्वीही दिला आहे.आज दि.१६ आँक्टोबर २०२० रोजी ईशान्य मुंबईतील घाटकोपर पश्चिम अमृत नगर सर्कल येथे १० गरजूंना अन्नधान्य किट देऊन मदतीचा हात देण्याची महत्वपुर्ण कामगिरी बजावली. योगिता हिरवे यांनी आपल्या वाढदिवसानिमित जेष्ठ नागरिकांना मदत देण्याच्या या उपक्रमाबद्दल त्यांचे जेष्ठ नागरिकांकडून आभार व्यक्त करत त्यांच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात असे आशिर्वादही दिले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा