अजिंक्य युवा प्रतिष्ठान (रजि.)आणि महात्मा ज्योतिबा फुले बहुद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.)तर्फे ७० गरजवंताना मदतीचा हात


मुंबई(शांत्ताराम गुडेकर) विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या  अजिंक्य युवा प्रतिष्ठान (रजि.)आणि महात्मा ज्योतिबा फुले बहुद्देशीय सेवा भावी संस्था (रजि.)यांच्या संयुक्त विद्यमानाने पालघर जिल्ह्यातील तांबडीपाडा , जगधनपाडा ,   सरावली ( निराधार कुटुंबांना वाटप ) काठयापाडा या तिन ठिकाणच्या ७० गरजवंत परीवारांना धान्यवाटप , मुलांना खाऊ वाटप , कपडे वाटप करण्यात आले.तांबडीपाडा आणि जगधन पाडा  ५० कुटुंब ३१० लोकसंख्या असलेला हा पाडा येथील ग्रामस्थ आणि शिक्षक वर्ग यांच्या बद्दल बोलण्या करीता शब्दच अपुरे पडतील असा त्यांचा स्वभाव , तेथील ग्रामस्थानची एकी आणि कोणत्याही हक्क अधिकारा करीता लढण्याची जिद्द फारच कॊतुकास्पद होती.गावात उपरोक्त संस्थेची टिम पोहोचल्या नंतर त्यांनी  केलेल स्वागत हे फारच आश्चर्यकारक होते.त्यांनी आदिवासी बांधवांच्या संस्कृतीचे दर्शन त्यांनी त्यांच्या  नृत्याच्या माध्यमातुन सादर केले त्यांच्या या नृत्या मध्ये संस्थे मधील कार्यकर्ते यांनी त्यांच्या तालावर ताल धरत सुंदर असे नृत्त्य सादर केले.


            शाळेतील मुख्याध्यापक संतोष निमसे त्यांचे सहकारी आदेश भोईर त्याच बरोबर स्वःताचा वेळात वेळ काढून संध्याकाळी मुलांना शिकवणारे गावातील मुलांनी शिकाव आणि स्वतःच्या जोरावर मोठं व्हावं अस ज्यांच स्वप्न आहे.तसेच, गावातिल विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात यावे असा ज्यांचा माणस आहे असे गावातील होत करू तरुण / समाजसेवक विलास हरी तांबडी आणि त्याच बरोबर ज्यांनी पाड्यातील मुलांन करीता सावित्री माई आणि ज्योतिबा फुले यांच्या पावलावर पाऊल ठेवत शिक्षणांकरीता आपली स्वतःच्या घराची दार खुली केलीत ते  मोरु लक्ष्मण तांबडी , आणि  त्यांची पली श्रीमती. अनुसया मोरू तांबडी या दापत्यांचे आभार मानू तेवढे कमीच आहेत त्यांनी गावात शाळा जिल्हापरिषद शाळा नसल्यामुळे आपल्या आदिवासी पाड्यातील मूलं शिकणार कुठे हा प्रश्न संपूर्ण पाड्याला पडल्यानंतर त्यांनी आपल्या घराचा काही हिस्सा मुलांच्या शिक्षणां करीता खुला केला व तेथे पाड्यातील १ली ते ५ वी पर्यंत ची मूल आनंदात शिक्षण घेत आहे या तांबडी दांम्पत्यास सगळ्यांनी सलामच केला.


         तेथील आदिवासी पाड्यात लाईट ही मागील ४ वर्षात आली , गावात प्राथमिक शाळा सुरू झाली , गावात रस्ता आला परंतु हे सर्व शक्य झाले ते फक्त आणि फक्त गावाच्या एकी मुळेच, का तर त्यांना या सर्व गोष्टी मिळवण्याकरीता आंदोलन करावी लागली , आजही शाळा गावात म्हणावी तशी शाळा नाहीच, शाळे करीता शासनाने मान्यता दिली पण शाळेची इमारत काही कारणास्तव बांधली नाही गेली , त्यामुळे शाळा आजही अपूर्ण आहे . 


    आजही त्या आदिवासी पाड्यात पाण्याची टंचाई जाणवते आहे , गावात विहीर आहे पण ती देखील लांब आहे जानेवारी महीना उजडला की विहिरीतील पाणी आटून जाते आणि विहिरीच्या आत ३० फूट अंतर विहिरीत खाली उतरून आदिवासियांना पाणी भरावे लागते , तेव्हा कुठे १ हंडा पिण्याकरीता पाणी मिळते फारच भयावह परिस्थिती आहे त्या ग्रामस्थानची.गावातील पहिलीच पिढी जी १२,वी पर्यंत मोजकीच मुले आता शिकलेली आहे , उत्पनाचे साधन नसल्यामुळे त्यांना पदवी पर्यंत पूर्ण शिक्षण घेता येत नाही , गावातील मुलांनी आज पर्यंत समूद्र किनारा बघितलेला नाही हीच मोठी शोकांतिका , त्यांच्या पासून समुद्र किनारा फक्त ३० किलोमीटर फक्त दूर आहे तरी पण त्यांची ही अवस्था जाणून मनाला चटका लाऊन जाणारी होती.आम्हाला त्यांच्या बरोबर काही क्षण आनंदाचे घालवता आले हे आम्ही आमचे भाग्यच समजतो असे मत उपरोक्त संस्था कार्यकर्त्यांनी व्यक्त केले. या उपक्रमा दरम्यान शाळेतील मुख्याध्यापक  संतोष निमसे  त्यांचे सहकारी  आदेश भोईर  त्यांनी गावातील  मुले शिकावी त्यांचे पैश्यामुळे त्यांचे शिक्षण थांबवू नये या करीता या शाळेतील शिक्षकांनी स्व-खर्चातुन स्वाध्याय पुस्तिका विकत घेऊन उपरोक्त आपल्या संस्थेच्या माध्यमातून त्यांचे अनावरन केले व वाटप देखील केले ,गावातील ग्रामस्थ आणि विद्यार्थियांनी सुंदर अशी न्यृत्य कला सादर केली त्याच बरोबर सुंदर अश्या आवाजात गाणं देखील बोलले खूपच अविस्मरणिय असे हे क्षण होते या लहान मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद एक वेगळीच जिवनाची दिशा देऊन जात होती . सरावली येथील काठयापाड्यात आम्हाला गावातील निराधार लोकांपर्यंत जिवनावश्यक गोष्टीचे वाटप करण्याकरीता तेथील शिक्षक  शिवदर्शन वाले आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्यानी विशेष सहकार्य केले. ज्यांनी ज्यांनी या उपक्रमाला सढल हस्ते मदत केली त्या सर्वांचे संस्थेच्यावतीने मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.संस्थेचे  हितचिंतक तसेच कार्यकर्ते दयानंद शेळके, दिपक चंदूरकर, प्रशांत यादव, गौतम बनसोडे,कु.स्वाती गावडे , श्रीमती.प्रेरणा वारंग, जनार्दन सकपाळ, विष्णू  रामंबाडे, सुशांत घवाळी, तेजस मांडवकर, लउ भातडे, अनंत जोशी ,जयवंत जोशी ,किशोर केरकर या सर्वांचे मनापासून आभार व्यक्त करण्यात आले.त्याच बरोबर संस्थेच्या या संपूर्ण प्रवाहात ज्या कार्यकर्त्यांनी  मोलाची भूमिका बजवाली त्या सर्व कार्येकरत्यांचे  देखील मनापासून आभार मानले. बाळ गोपाळ मित्र मंडळ ,साई माऊली मंडप डेकोरेटर्स आणि कॅटरर्स यांनी विशेष सहकार्य केले.शेवटी प्रसाद शितल सिताराम मांडवकर यांनी आभारप्रदर्शनाने या कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.


टिप्पण्या