सफल विकास वेल्फेअर सोसायटी व राष्ट्र सेवा दल,मालवणीतर्फे आणि एस.ल.रहेजा हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबीर संपन्न 


मुंबई(शांत्ताराम गुडेकर ) सफल विकास वेल्फेअर सोसायटी, राष्ट्र सेवा दल,मालवणीतर्फे आणि एस.ल.रहेजा हॉस्पिटलच्या सहकार्याने रक्तदान शिबीर पार पडले.कोरोना महामारीमुळे लोक घराबाहेर पडत नव्हते.ते घाबरत होते.तरीसुद्धा या सगळ्यावर मात करत संस्थेच्यावतीने  हे दुसरे रक्तदान शिबिर घेतले गेले.पहिल्या रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यांनी रक्तदान केले होते तर या शिबिरतही ५० रक्तदात्यांनी रक्तदान केले.सफल विकास वेल्फेअर सोसायटीचे अध्यक्ष सय्यद निसार अली बोलताना म्हणाले की, देश आणि सारी दुनिया कोरोनाने हैराण आहे.अशा संकटकाळी प्रत्येक भारतीय नागरिकाचे देशासाठी आपले कर्तव्य म्हणून पुढे येऊन रक्तदान करण्याचे. प्रत्येक नागरिक सीमेवर जाऊन लढू शकण नाही मात्र देश संरक्षणासाठी  रक्तदान करुन आपले कर्तव्य सहज पार पाडू शकतो. सफलच्या सेक्रेटरी वैशाली महाडिक सय्यद म्हणाल्या की, देशासाठी काय तरी करु आशी इच्छा मनाशी बांधून तरुण-तरुणींनी व स्थानिक रहिवाशी यांनी रक्तदान करुन या देशसेवेला हातभार लावू.या आपल्या रक्तामुळे सैनिकांसह अनेकांचे प्राण वाचणार आहेत.तेव्हा रक्तदानासारखे दुसरे दान नाही.तुम्ही रक्तदान करा न आपल्या मित्रपरिवारालाही रक्तदान करायला सांगा असे भावनिक आवाहन केले.तर राष्ट्र सेवादल मालवणी शाखा अध्यक्षा नमिता मिश्रा यांनीसुध्दा युवकांना रक्तदान करण्याचे आवाहन केले. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ता मुरुगन पिल्लई यांनी रक्तदान सर्वश्रेष्ठ दान असा संदेश देत रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले.याशिवाय  राष्ट्र सेवादल आणि सफल विकास वेल्फेअर सोसायटीच्या या उपक्रमांचे कौतुक केले.यावेळी  राष्ट्र सेवादल, मालवणी,मालवणी युवा परिषद टीम,मुस्लिम सत्यशोधक मंडळ,एस. एल. रहेजा हॉस्पिटल,डीवाईन प्रॉव्हिडेंट हाय स्कुल,वरीष्ठ पत्रकार समिउल्लाह खान , प्रिंटर प्रकाश जैस्वार,मेरी चेट्टी,सोनाली,अक्षय,आपटे,मनोज परमार आदी सर्व उपस्थिती मान्यवरांचे  सय्यद निसार अली यांनी आभार व्यक्त केले.


टिप्पण्या