मनसे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष जितेंद्रजी चव्हाण यांच्या उपोषणाचा विजय,मागण्या मान्य
रत्नागिरी (हृषिकेश सावंत):- रत्नागिरीतील विद्युत पारेखण कंपनीच्या समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने रत्नागिरी मनसे जिल्हाध्यक्ष श्री जितेंद्र चव्हाण यांचे वाढीव विद्युत बिलांच्या विरोधात लाईट बिल माफ करावे व मागील ११ वर्षे विजेचे खांब व विद्युत वाहिन्या ज्या जमीनदार शेतकर्यांच्या जमिनीतून गेल्या आहेत त्याचे भाडे मिळावे याकरिता आमरण उपोषण सुरु होते.
कोरोना काळात आर्थिकदृष्ट्या पिचलेल्या नागरिकांना अवास्तव बिले आकारुन विद्युत मंडळाने अन्याय केला आहे.शासन याकडे लक्ष देत नाही.अॉनलाईन भरलेली बिले वजावट होत नाहीत.मनसेने सर्वसामान्य नागरिकांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली होती.महावितरण कंपनीने लेखी तथा मिडिया समोर जितेंद्र चव्हाण यांच्या मागण्या मान्य केल्या असून येत्या १५ दिवसांत निर्णय घेऊन रत्नागिरीकरांना दिलासा देवु अशी ग्वाही दिली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा