शहरातील स्वच्छतेसाठी महापालिका आयुक्त डॅा. शर्मा रस्त्यांवर, कचरा टाकण्याऱ्या दुकानांना जागेवरच दंड


कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा आयुक्तांचा इशारा


ठाणे(प्रतिनिधी ): स्वच्छता पंधरवडा निमित्त ठाणे शहर स्वच्छ करण्यासाठी सुरु असलेल्या साफसफाई कामाच्या पाहणीसाठी महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा स्वतः रस्त्यावर उतरले असून आज शहरातील ज्या दुकानांसमोर कचरा आहे त्या सर्व दुकानांवर जागेवरच दंडात्मक कारवाई केली. दरम्यान यापुढे रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई करण्याच्या ईशारा महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी दिला आहे. 


आज कॅडबरी जंक्शन, खोटप रोड, एसटी स्टॅन्ड खोपट, एलबीएस मार्ग, गाव देवी माता मंदिर चौक, मखमली तलाव, अल्मेडा रोड, पाचपाखडी, रायगड अळी, आदी ठिकाणांच्या साफसफाई कामाची महापालिका आयुक्त डॉ.शर्मा यांनी पाहणी करून कचरा टाकणाऱ्या दुकानांवर दंडात्मक तात्काळ कारवाई केली. दरम्यान शहरातील साफसफाई कामात कोणाचीही गय केली जाणार नसून यापुढे रस्त्यांवर कचरा टाकणा-यांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी घनकचरा विभागाला दिले.


दिनांक 2 ऑक्टोबर  2020 ते 16 ऑक्टोबर 2020 या कालावधीत घोषित करण्यात आलेल्या स्वच्छता पंधरवडा निमित्त शहरात जोरदार स्वच्छता मोहीम सुरु असून ठाणे महापालिकेची संपूर्ण यंत्रणा रस्त्यावर उतरली आहे. सर्व प्रभाग समितीस्तरावरील अधिकाऱ्यामार्फत स्वच्छता मोहीम राबविण्याचे काम सुरु आहे.


आज महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी रस्त्यांवर उतरून शहरातील साफसफाई कामाची पाहणी केली.  यावेळी उप आयुक्त संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, माहिती व जनसंपर्क अधिकारी महेश राजदेरकर, सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, प्रणाली घोंगे आदी उपस्थित होते.


टिप्पण्या