रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय शासनाच्या आदेशाचे पालन करत वाचकांच्या स्वागतासाठी उद्यापासून रुजू होईल:-ऍड. दीपक पटवर्धन
रत्नागिरी (हृषिकेश सावंत):- ७ महिन्या नंतर वाचनालये परत सुरू करण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला त्यामुळे वाचक सभासदांना खूप आनंद झाला आहे.ना.उदयजी सामंत मंत्री महाराष्ट्र यांनी 8 दिवसांपूर्वी याबाबत सकारात्मकता दर्शवली होती, आज प्रत्यक्ष आदेश निघाले. नागरवाचनालायचे वतीने ना.उदयजी सामंत साहेब व महाराष्ट्र शासनाला धन्यवाद.
वाचक प्रेरणा दिना पासून परत वाचनालये वाचकांसाठी खुली होत आहेत. वाचकांचे स्वागत करण्यासाठी रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय सज्ज आहे. उद्या पासून घरपोच पुस्तक सुविधा तसेच स्टोरी टेल अँप ची सुविधा वाचक सभासदांना उपलब्ध असेल.
सोशल डिस्टन्ससिंग, सेनेटायझर, मास्क तसेच जमा होणारी पुस्तके स्वतंत्र ठेवण्याची सुविधा तसेच शासन निर्दिष्ट करेल त्या उपाययोजना काटेकोर पणे अमलात आणून वाचनालय ग्रंथप्रेमी ना सेवा देईल.
7 महिन्यात ठप्प झालेले आर्थिक व्यवहार सुरू होऊन वाचनालायकडे वर्गणी ची आवक सुरू होईल बंद च्या कालावधी पासून ते उद्या पासून आठ दिवसात आपल्याकडील पुस्तके वाचनालयात जमा करणाऱ्या वाचकांकडून कोणतेही लेट चार्जेस वसूल केले जाणार नाहीत असा निर्णय व्यवस्थापक मंडळाने घेतला आहे.मात्र वाचनालयाची आर्थिक गरज लक्षात घेऊन वाचक सभासदांनी मार्च ते ऑक्टोबर 20 पर्यंत ची वर्गणी भरून सहकार्य करावे असे विनम्र आवाहन वाचक सभासदांना ऍड.दीपक पटवर्धन अध्यक्ष रत्नागिरी जिल्हा नगर वाचनालय यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा