पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाच्या अध्यक्षपदी दत्ता वाकसे यांची नियुक्ती करा


आ. रोहित पवार, खा सुप्रिया सुळे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना महाराष्ट्रातील दोनशे युवकांचे ईमेल

 


मुंबई(शांताराम गुडेकर) : चळवळीत स्वतःचे आयुष्य समर्पित करणारे आणि गेल्या पंचवीस तीस वर्षापासून धनगर समाजाच्या उन्नतीसाठी विकासासाठी वयाच्या सोळा वर्षापासून स्वतःला चळवळीमध्ये वाहून घेतलेली नेतृत्व म्हणून दत्ता वाकसे यांच्याकडे पाहिले जात आहे गेल्या काही दिवसापासून पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळ अध्यक्षपदाच्या निवडीबाबत चर्चा चाललेले आहेत ह्या चर्चेला अनुसरून करून मराठवाडा विदर्भ पश्‍चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण या जिल्ह्यातील धनगर समाजाच्या तरुण युवकांनी महाराष्ट्र राज्याच्या खासदार सुप्रियाताई सुळे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित दादा पवार यांच्याकडे ईमेलद्वारे मागणी केली आहे त्या दिलेल्या ईमेलमध्ये म्हटले आहे की धनगर समाजाचे राज्याचे नेते दत्ता वाकसे हे गेल्या पंचवीस ते तीस वर्षापासून सामाजिक चळवळीमध्ये काम करत असून मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या ठिकाणी धनगर समाज बहुल भागांमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने ते काम करत आहेत धनगर समाजाच्या मेंढपाळाच्या प्रश्नासाठी वेळोवेळी ते रस्त्यावर असतात त्यामुळे पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर शेळी मेंढी महामंडळाला मेंढपाळाची जाण असलेला अध्यक्ष मिळावा अशी मागणी देखील या निवेदनामध्ये केली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस  आपल्या पक्षाला त्यांच्या माध्यमातून धनगर समाजाच्या मताचा प्रभाव वाढेल असेल देखील दिलेल्या ईमेलव्दारे म्हटले आहे


टिप्पण्या