मुंबईच्या डब्बेवाल्यांचा राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याहस्ते सन्मान व सायकल भेट


मुंबई(शांत्ताराम गुडेकर ) घाटकोपरच्या श्री साई श्रद्धा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष तसेच भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य शुभ्रंशु दीक्षित यांच्या वतीने मुंबईच्या डब्बेवाल्यांना मोफत सायकल वाटप व सन्मान कार्यक्रम आज १९ ऑक्टो रोजी राजभवन येथे पार पडला.राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते मुंबईच्या डब्बेवाल्याचा सन्मान व त्यांना मोफत सायकल वितरित करण्यात आले. यावेळी प्रतिष्ठाणचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. मुंबईच्या विविध क्षेत्रातील कार्यालयात अन्नाचा डब्बे पोहोचवण्याचे कार्य मुंबईचे डबेवाले करत असतात. मुंबईची बेस्ट , लोकल ने त्यांचा प्रवास असतो तर काही परिसरात डब्बेवाले सायकल ने डब्बा पोहीचवतात. मुंबईच्या या डब्बेवाल्यानी कोरोना काळात अनलॉक मध्येही त्यांनी जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडली . त्यांचा सन्मान राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते करत त्यांना सायकल भेट देण्यात आल्याचे प्रतिष्ठाणचे अध्यक्ष शुभ्रंशु दिक्षित यांनी सांगितले.


टिप्पण्या