परतीच्या पावसामुळे राजापूरात भातशेतीचे प्रचंड नुकसान,नुकसान भरपाई तातडीने मिळण्याची मागणी


राजापूर (विनोद चव्हाण) दोन दिवस संतधार पडणाऱ्या परतीच्या पावसामुळे बळीराजाचं मोठं नुकसान झालेल्या पाहायला मिळते. बळीराजाचा हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे मिळेनासा झालाय राजापूर मध्ये पडलेल्या तुफान पावसाने शेतकऱ्याचा जीव मेटाकुटीला आणला आहे. कोरोनाच्या संकट मुळे मुंबई मधील चाकरमानी शेतीकडे वळला होता असे असताना परतीच्या पावसाने त्यांच्या तोंडाचा घास कडून घेतला आहे. काल झालेल्या पावसामुळे संपूर्ण भात शेती जमीनदोस्त झालेला आहे. मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालं आहे. सरकारने कुठेतरी ही नुकसान भरपाई भरून द्यावी अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे.


राजापुरात मुसळाधार पावसानं पूरसदृश्य परिस्थिती, अजुर्ना आणि कोदावली, मुचकुंदी  नद्यां धोक्याच्या पातळीवर, राजापूरच्या जवाहर चौकापर्यंत पाणी, पाणी वाढत असल्याने राजापूर बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना सतर्कतेच्या सूचना, राजापूर बाजारपेठेत पाणी घुसल्याने व्यापारी वर्गाला दुकानातील मालाचे प्रचंड नुकसान झाले. कोरोनाने सात महिन्यात मोडलेल कंबरडे सावरत राजापूर मधील व्यापारी व शेतकरी, मजूर स्वतःला सावरत असताना परतीच्या पावसाने शेतकरी व व्यापारी वर्गाच्या तोडच घास पळवला असल्याची चर्चा जनतेतून करण्यात येत आहे.  स्थानिक प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी पुढाकार घेऊन झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यास पुढाकार घ्यावा व शेतकरी व्यापारी वर्ग यांना सहकार्य करावे अशी विनंती करण्यात येत आहे.


टिप्पण्या