मुख्यमंत्र्यांच्या रक्तदान श्रेष्ठ दान हाकेसाठी संभाजी ब्रिगेड चा पुढाकार


मुंबई (शांत्ताराम गुडेकर/ सागर पगारे) : गेल्या मार्च पासून ते आता पर्यंत कोरोना चा प्रादुर्भाव कमी झालेला दिसत नाही, किंबहुना त्यावर अजून लस किंवा एखाद्या औषधाची चाचणी झालेली नाही, त्यातच हॉस्पिटलमध्ये ही रुग्णाची संख्या कमी होताना दिसत नाही. रुग्णांना रक्त पुरवल्या जाणाऱ्या रक्तपेढ्या मध्ये रक्त सहजासहजी मिळत नाही. त्यावर एकदा मुख्यमंत्री साहेबांनी पण राज्याला संबोधून रक्तदान करा आव्हान केले होते. भविष्यात येणाऱ्या ह्या आव्हानाला साद घालत मुंबई मध्ये मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड ने पुढाकार घेत मुंबई प्रदेशचे अध्यक्ष अमोल (भैय्या) जाधवराव  वाढदिवसानिमित  मुंबईत रक्तदान शिबिराचे आयोजन करून रक्तदान श्रेष्ठ दान म्हणत संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी बोरिवली पश्चिम येते रक्तदानाचा कार्यक्रम यशस्वी पार पडला.

टिप्पण्या