लांजात ढगफुटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान, बेनीत शेती पाण्याखाली


लांजा (दिपक मांडवकर ) तीन दिवसापासून लांजा तालुक्यात परतीच्या पावसाने धुमाकुळ घातला असून ढगफुटीसारख्या कोसळणाऱ्या पावसामुळे बेनीतील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.संपुर्ण शेती पाण्याखाली गेली आहे. एेन सराईच्या दिवसात कोसळलेल्या पावसामुळे हातातोंडाशी आलेले पिक शेतकरी गमावून बसला आहे.सरकारी यंत्रणेने नुकसान झालेल्या शेतीचा पंचनामा करुन भरपाई द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.


गेल्या तीन दिवसापासून पावसाने लांजा तालुक्यात धुमाकुळ घातला आहे.लांजा शहरात पुरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.नदी नाले,ओसंडून वाहू लागले आहेत.त्यामुळे जनजीवनही विस्कळीत झाले आहे.शहरात बऱ्याच ठिकाणी नुकसान झाले आहे.तर ग्रामीण भागातील शेतऱ्यांचे हातातोंडाशी आलेले पिक पाण्यात गेले असून शेतकऱ्यांचे खूप मोठे नुकसान झाले आहे.


सराईचे दिवस असल्याने तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी भात कापणीला सुरवात केली होती.मात्र अचानक वादळ-वारा आणि ढगफुटी झाल्याने कापलेले शेत पाण्यात भिजले आहे.काही ठिकाणी भातालाच कोंब फुडल्याचे निदर्शनास येत आहे.संपुर्ण शेती जमीनदोस्त झाली असून सरकारने शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी जनतेतून होत आहे.


टिप्पण्या