पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कु.रचित पातये व कु राजा पालये यांचं घवघवीत यश
मुंबई(शांत्ताराम गुडेकर/दिपक कारकर) विद्यार्थी हा ज्ञान सागरात पोहणारा राजहंस पक्षी आहे.शिक्षण ही काळाची गरज आहे. आणि आता शिक्षण क्षेत्रात कोकण नेहमीच अग्रेसर राहिलं आहे. नुकतीच फेब्रुवारी - २०२० रोजी घेण्यात आलेली पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा या परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी जाहीर करण्यात आला.या परीक्षेत रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक आदर्श केंद्रशाळा वाटद - मिरवणे ता.जि.रत्नागिरी या शाळेने घवघवीत यश संपादन करून शाळेचा निकाल १००% लावण्यात शाळा यशस्वी ठरली.या परीक्षेत बसलेले वाटद - मिरवणे माचवाडीतील सुपुत्र कु. रचित नरेश पातये व कु.राजा दिनकर पालये या विद्यार्थ्यांनी उत्तम गुण प्राप्त करत शाळेचं,गावाचं व आई-वडिलांचे नाव उज्वल केले आहे.
या परीक्षेत उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांचे,हे यश संपादन करण्यासाठी मार्गदर्शन करणाऱ्या शालेय शिक्षक कर्मचारी/पालक ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती तसेच वाटद-मिरवणे पंचक्रोशीतुन विद्यार्थ्यांचे अभिनंदनासह कौतुक होत आहे.तसेच सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या संतोष घाणेकर यांच्या श्री पाणबुडी देवी कलामंच व तरुण विकास मंडळ ( रजि.) व सर्व शिक्षक,स्थानिक रहिवाश्यांकडून या विद्यार्थ्यांच्या नेत्रदीपक कामगिरीसाठी अभिनंदनासह शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा