रायगड मध्ये ओला दुष्काळ जाहीर करून सर्व शेतकर्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी : मराठा सेवा संघ संभाजी ब्रिगेडची मागणी
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेडच्या वतीने माणगांवचे नायब तहसीलदार माननीय श्री. भाबड यांना दिलेल्या लेखी निवेदनाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शासनाकडून सर्व शेतकर्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष श्री भूषण सिसोदे आणि त्यांचे सहकारी यांनी सरकार कडे केली आहे.
या वर्षी पाऊसाने संपुर्ण राज्यामध्ये दमदार हजेरी लावलेली आहे.गत वर्षी पेक्षा यंदाच्या वर्षी पाऊसाचे प्रमाण प्रमाणापेक्षा असल्याचे हवामान तज्ञांकडून अंदाज वर्तवण्यात आलेले होते.वास्तविक हवामान तज्ञांच्या अंदाजापेक्षा हि अधिक पाऊस सर्वत्र पडलेला आहे.रायगड जिल्ह्यामध्ये पावसाळ्याच्या सुरवातीपासूनच अपेक्षे पेक्षा जास्त पाऊस झालेला आहे.परतीच्या पाऊसाने संपुर्ण रायगड जिल्ह्यामध्ये हाहाकार माजलेला आहे.
सदर पाऊसामुळे रायगड जिल्ह्यामध्ये सर्व तालुक्यांमध्ये शेतीमधील पिकांचे प्रचंड नुकसान झालेले आहे.यामध्ये प्रामुख्याने भात शेती पिकांसह पालेभाज्यांनाही मोठ्या प्रमाणात पाऊसाचा फटका बसलेला आहे.शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालेले आहे.सदर परिस्थितीचा विचार करता मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड च्या माध्यमातून पुढील मागण्या केल्या आहेत.
१) रायगड जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहिर करण्यात यावा.
२) पाऊसामुळे शेतीपिकांच्या झालेल्या नुकसानीचे युद्धपातळीवर पंचनामे करण्यात यावेत.
३) पाऊसामुळे बाधित झालेल्या शेतकर्यांना एकरी
५०,००० रुपये नुकसान भरपाई सरसकट सर्व पिकांसाठी देण्यात यावी.
तरी परिस्थितीचे गांर्भीय ओळखून शासनाकडून तातडीने उपाययोजना करण्यात यावी.व वरील मागण्यासंदर्भात योग्य ती कार्यवाही तातडीने करण्यात यावी.
अशी मागणी शिवश्री भूषण राजाराम शिसोदे
रायगड द जिल्हा अध्यक्ष यांनी
मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड च्या वतीने माणगांव नायब तहसीलदार माननीय भाबड यांना दिलेल्या लेखी निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. सदर निवेदनाची प्रत महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री श्री उद्धव जी ठाकरे, मा.कृषी मंत्री,महाराष्ट्र राज्य,मुंबई,मा.जलसंपदा मंत्री,महाराष्ट्र राज्य,मुंबई,
मा.विरोधी पक्षनेते,महाराष्ट्र राज्य,मुंबई,मा.जिल्हाधिकारी,रायगड जिल्हा,रायगड यांना देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा