लांजा - वाडगाव रस्त्यावर टेम्पोच्या अपघातात चालक जागीच मृत्युमुखी,गुन्हा दाखल


लांजा (ह्रषिकेश सावंत) भरधाव टेम्पो रस्त्याच्या बाजूला असलेल्या मोरीच्या कठड्यावर आदळून झालेल्या अपघातात टेम्पोचालकाला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यु होण्याची घटना बुधवारी रात्री सव्वानउ वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील लांजा-वाडगाव रस्त्यावरील खेरवसे तिठा येथील मोरीजवळ घडली.


याबाबत पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार ,मिलींद चंद्रकांत शिंदे (45 वर्षे,रा.कोर्ले तिठा,ता.लांजा) हे बुधवारी रात्री आपल्या ताब्यातील टाटा छोटा हत्ती (एम.एच.०८ एपी -०४२१) घेवून लांजा वाडगाव असे जात होते.रात्री ९.१५ वाजण्याच्या सुमारास त्यांचा टेम्पो खेरवसे येथे आला असता येथील रस्त्याच्या एका मोरीच्या कठड्याला टेम्पोची जोरदार धडक बसली.जोरदार धडकेमुळे टेम्पोचालक मिलींद शिंदे याचा जागीच मृत्यु झाला.


अपघाताची माहीती मिळताच लांजा पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक दिलीप पवार,उदय धुमासकर,हेड.कान्स्टेबल राजेंद्र कांबळे, अरविंद कांबळे,चालक चेतन घडशी यांनी तात्काळ घडनास्थळी धाव घेवून भेट दिली.व पंचनामा केला.भरदाव बेदकारपणे वाहन चालविल्याबद्दल टेम्पोचालक मिलींद शिंदे यांच्या विरोधात मोटार वाहन कायदा कलम १८४ नुसार भा.द.वि.कलम ३०४ अ,२७९,३३७,३३८,अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संजय चौधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक सुनिल चवेकर हे करीत आहेत.


टिप्पण्या