निर्दयी बाप...पैश्यांसाठी स्वताच्याच बाळाचे अपहरण,ठाण्यातील भाजप पदाधिकाऱ्यांमुळे पाच महिन्याचे बाळ सुखरुप
ठाणे (प्रतिनिधी) बायकोच्या जीवावर अय्याशी करण्यासाठी तिची वडिलोपार्जित मालमत्ता मिळविण्याच्या उद्देशाने तिच्याशी कडाक्याचे भांडण आणि बेदम मारहाण करुन स्वताच्याच ५ महिन्याच्या मुलाचे अपहरण करणाऱ्या पांडे नामक निर्दयी बापाला कापूरबावडी पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.ही घटना ठाण्यातील ढोकाळी परिसरात घडली असून भाजपाचे कामगार आघाडीचे कोकण विभाग सरचिटणीस श्री महेश मोरे आणि त्यांचे सहकारी अड. सुनिल तिवारी यांच्या प्रसंगावधानामुळे हे दुध पिणारे बाळ तिच्या आईकडे सुखरुप परतले आहे.
रविवारी सायंकाळी ठाण्यातील ढोकाळी परिसरात राहणाऱ्या राहणाऱ्या सौ.पांडे यांच्या वडिलांचे १४ दिवसांपुर्वीच निधन झाले होते.निधनानंतर लगेचच सौ.पांडे या मालमत्तेच्या वारसदार असल्याने वडिलांची मालमत्ता आपल्याला मिळावी म्हणून पती महेंद्रे पांडे याने सतत तगादा लावला. यात त्यांचे कडाक्याचे भांडण झाले.यात सौ.पांडे यांचे पती महेंद्रे पांडे याने बेदम मारहाण केली आणि आपल्या ५ महिन्याचं दुध पिणारं बाळ घेवून पलायन केले.त्यामुळे घाबरलेल्या सौ.पांडे यांनी कापूरबावडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.दरम्यान बाळ पाच महिन्याचे दुध पिणारे असल्याने सौ.पांडे यांना पोलीस ठाण्यात तासंतास उभे रहावे लागले.त्यामुळे या महिलेने ठाण्यातील भाजपचे पदाधिकारी श्री महेश मोरे,सुनिल तिवारी यांना फेसबुक वरुन मदतकार्यासाठी संपर्क साधला.कापूरबावडी पोलीस ठाण्यात पोलीस आपले बाळ परत मिळवून देतील या आशेने तासनसात वाट पाहणाऱ्या सौ.पांडे यांना धीर देत पोलीसांना तातडीने तपासकार्य करण्याचे सांगितले. कापूरबावडी पोलीसांनी या प्रकरणी तपास केला असता हे ५ महिन्याचे बाळ डोंबिवलीतील लोढा पलावा येथे असल्याचे समजले. पोलीसांनी महेंद्र पांडे यांना बाळ देण्याची विनंती केली.मात्र त्यांने पत्नीने साडेपाच लाख रुपये दिले तरच बाळ परत देईन अशी मागणी केली. या निर्दयी बापाने स्वताच्याच बाळाची अशी मांडवली केल्यामुळे अखेर पोलीसांनी चांगलाच खाक्या दाखवला. अखेर 24 तासानंतर हे दुध पिणारे बाळ आईकडे परत परतले.
दरम्यान सौ.पांडे यांनी आपला नवरा अय्याशी करणारा,सायको असून कोणत्याही क्षणी बाळाचे बरेवाईट करु शकतो असे सांगितले आहे.त्यामुळे मला संरक्षण मिळावे अशी मागणी केली आहे.या घटनाक्रमानंतर कापूरबावडी पोलीस ठाण्याचे पोलीस आणि भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले असल्याचे महिलेने सांगितले.महिलांवर अश्याप्रकारे अन्याय झाल्यास भारतीय जनता पार्टी गप्प बसणार नाही असे मोरे यांनी सांगितले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा